कोल्हापूर, 05 जुलै : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात मागच्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने दैना उडाली आहे. (Kolhapur rain) काल सकाळी सुरू झालेल्या पावासाने पंचगंगा नदी पातळीत (panchaganga river level) तब्बल 8 फुटांनी वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. (imd says Kolhapur heavy rain fall in four days) कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार (Kolhapur collector rahul rekhawar) यांनीही जिल्हा आपत्ता व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
मागच्या 24 तासांता तब्बल 8 फुटांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने सायंकाळी साडेसात वाजता राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. खरबदारीचा उपाय म्हणून या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. राजाराम बंधाऱ्यावरून सध्या 8 हजार 156 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. राजाराम बंधाऱ्यासह भोगावती नदीवरील हळदी, कोगे, कुंभी, मांडुकली हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. सोमवारी दिवसभरात पाच बंधाऱ्यांवर पाणी आले. रूई आणि इचलकरंजी हे बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत.
हे ही वाचा : मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; या भागात रस्ते तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. जोरदार पावसाने पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह पाच बंधारे पाण्याखाली गेले. यामुळे पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या सात झाली. कोल्हापूर- खारेपाटण मार्गावर भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. बर्की (ता. शाहूवाडी) येथे अडकलेल्या 80 पर्यटकांची सुटका करण्यात आली.
हवामान विभागाने शुक्रवार, दि. 8 पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दक्षतेचे आदेश दिले. कोल्हापूर शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 21 मि.मी. पावसाची नोंद झाली.
हे ही वाचा : संततधार पावसाचा पहिला फटका! भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली, पाहा VIDEO
जिल्ह्यात 8 जुलै 2022 पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवावा जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४ टोल फ्री क्रमांक १०७७ अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना
दरम्यान आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 23 फूट 10 इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी - 39 फूट व धोका पातळी - 43 फूट आहे.) एकुण पाण्याखालील बंधारे : 6 आहेत. पुढच्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास कोल्हापूर जिह्यात पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Monsoon, Rain in kolhapur, Rainfall, Weather forecast, Weather update