मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Kisan Credit Card: शेतकऱ्यांसाठी खास क्रेडिट कार्ड, कमी व्याजात मिळेल कर्ज, इतरही अनेक फायदे

Kisan Credit Card: शेतकऱ्यांसाठी खास क्रेडिट कार्ड, कमी व्याजात मिळेल कर्ज, इतरही अनेक फायदे

Kisan Credit Card: शेतकऱ्यांसाठी खास क्रेडिट कार्ड, कमी व्याजात मिळणार कर्ज, इतरही अनेक फायदे

Kisan Credit Card: शेतकऱ्यांसाठी खास क्रेडिट कार्ड, कमी व्याजात मिळणार कर्ज, इतरही अनेक फायदे

Kisan Credit Card Updates: शेतकरी शेतीसाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी परवडणाऱ्या दरात क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेऊ शकतात. याद्वारे शेतकऱ्यांना हमीशिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज दिलं जातं.

  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 31 जुलै : किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही केंद्र सरकारद्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी चालवली जाणारी योजना आहे. या क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) शेतकरी शेतीच्या कामासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. याद्वारे शेतकऱ्यांना हमीभावाशिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज दिलं जात आहे. त्याचबरोबर 3 वर्षात शेतकरी याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. कर्ज वेळेवर संपुष्टात आणल्यास, या क्रेडिट कार्डद्वारे व्याज देखील फक्त 4 टक्के असेल. हे मिळवणं खूपचं सोपं आहे. यासाठी तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खातं असणं आवश्यक आहे.

2 वर्षात 3 कोटी शेतकऱ्यांना मिळाले हे कार्ड-

सरकारनं गेल्या दोन वर्षांत विशेष मोहीम राबवून 3  कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यकतेनुसार कर्ज सहज मिळू शकते. शेतकऱ्यांना ते कमी व्याजासह सोप्या पद्धतीनं परत करण्याची सुविधा आहे.

हेही वाचा- Top Upcoming Cars in August 2022: Maruti Alto ते Mahindra, 'या' कार पुढील महिन्यात होणार लॉन्च, वाचा डिटेल्स

व्याज कसं मोजलं जातं?

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी 5 वर्षांत 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांना 9 टक्के दरानं कर्ज मिळतं, मात्र सरकार त्यावर 2 टक्के अनुदान देतं. या अर्थानं त्यावर 7 टक्के व्याज होतं. मात्र हे कर्ज शेतकऱ्यानं वेळेवर परत केल्यास सरकार त्याला आणखी तीन टक्के सवलत देतं. अशा प्रकारे कर्जावर फक्त 4 टक्के व्याज भरावं लागतं.

5 वर्षे वैधता-

किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्षे आहे. 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता हमीशिवाय उपलब्ध आहे. यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती. अधिसूचित पिके / अधिसूचित क्षेत्रे सर्व KCC कर्जावर पीक विम्याच्या अंतर्गत समाविष्ट आहेत.

क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा-

  • सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ अधिकृत साइटवर जा.
  • किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाउनलोड करा.
  • हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल.
  • तुम्हाला इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून बनवलेले किसान क्रेडिट कार्ड मिळालेले नाही हे देखील द्यावे लागेल.
  • अर्ज भरून सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

या कागदपत्रांची असेल आवश्यकता-

ओळखपत्राच्या पुराव्यासाठी कागदपत्रे: मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/पासपोर्ट/आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स इ.

पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रे: मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागदपत्रं आवश्यक आहेत.

First published:

Tags: Credit card, Farmer