Home /News /agriculture /

KDS 992 soybean: सोयाबीनच्या नव्या जातीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार

KDS 992 soybean: सोयाबीनच्या नव्या जातीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत (Mahatma Phule Agricultural University of Rahuri) असलेल्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले 'केडीएस-९९२' हा सोयाबीन वाण (KDS 992 soybean) राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

  कोल्हापूर, 13 मे : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत (Mahatma Phule Agricultural University of Rahuri) असलेल्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले 'केडीएस-९९२' हा सोयाबीन वाण (KDS 992 soybean) राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने उत्पादनात वाढ व्हावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने सोयाबीन वानावर संशोधन करून 'केडीएस ९९२' हा वाण विकसित केला आहे. 

  आतापर्यंत राज्यात १५ पेक्षा जास्त वाण आहेत. कृषी संशोधन केंद्राचे संशोधक व सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांच्यासह सहकाऱ्यांनी साधारण आठ ते दहा वर्षे संशोधन करून 'केडीएस-९९२' हा (KDS 992 soybean) वाण सोयाबीन वाण विकसित केला आहे.

  हे ही वाचा : Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे बरसणार सरी; राज्यात आज कसं असेल हवामान?

  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप कटमाळे, सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी या संशोधनासाठी मदत केली आहे.

  प्रसारित वाणाचे वैशिष्ट्य :-

  • केडीएस - ९९२' या सोयाबीन वाणाची उत्पादकता ६ क्विंटल अधिक आहे.
  • हा वाण दक्षिण भारतात पाने खाणार्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील, तर तांबेरा रोगास कसबे डिग्रज येथे मध्यम प्रतिकारक्षम असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
  • या वाणाचे दाणे मोठ्या आकाराचे असून, १०० ते १०५ दिवसांत हा वाण पक्व होतो. बदलत्या वातावरणावर काही अंशी मात करणारा हा वाण आहे.
  • मल्टी पल्पर सीड (दाण्यावरील ठिपके) या रोगालाही काही प्रमाणात हा वाण प्रतिकार, करतो.
  • सोयाबीनच्या इतर वाणांपेक्षा हे वाण किफायतशीर आहे.

  हे ही वाचा : महागाईचा भडका! 8 वर्षात सर्वाधिक वाढली महागाई; भाजी, डाळ, वीज सर्वांचेच दर कडाडले

  देशात व राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्पादन वाढ आणि बदलत्या वातावरणावर मात करण्याच्या दृष्टीने 'केडीएस-९९२' हा सोयाबीन वान विकसित केला आहे. आठ ते दहा वर्षे त्यावर संशोधन केले. पाच राज्यात लागवडीसाठी शिफारस झाली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer

  पुढील बातम्या