Home /News /agriculture /

Pre Monsoon Rain : 'या' जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने 2 हजार हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत

Pre Monsoon Rain : 'या' जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने 2 हजार हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत

वादळी वाऱ्यासह (cyclone) मॉन्सूनपूर्व पावसामुळे (pre monsoon rain) दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  जळगाव, 12 जून : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) पाच तालुक्यांत मागच्या दोन दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह (cyclone) मॉन्सूनपूर्व पावसामुळे (pre monsoon rain) दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जळगावसह नाशिक (Jalgaon, Nashik heavy rain) जिल्ह्यात जोरदार पावसाने मागच्या दोन दिवसांत दैना उडाली होती. शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या फळबागांना याचा मोठा (This is a big blow to farmers' orchards) फटका बसला आहे. यात प्रामुख्याने केळी पिकाचे नुकसान n झाले आहे. सर्वाधिक नुकसान केळीचे झाल्यान असून शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

  जळगाव, चोपडा, धरणगाव, पाचोरा, भडगाव अशा पाच तालुक्यांत पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यात एकूण 49 गावांतील 1 हजार 376 शेतकरी बाधित झाले आहेत. केळीचे सर्वाधिक 2 हजार 11 हेक्टर नुकसान झाले असल्याची प्राथमीक माहितीसमोर आली आहे. पपईचे पाच हेक्टर, तर लिंबाचे दहा हेक्टरवर नुकसान झाले आहे. 

  हे ही वाचा : पराभवानंतर सेनेचं आत्मचिंतन? राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काळजी घ्या, मंकीपॉक्स हवेतून पसरतोय TOP बातम्या

  जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे रावेर मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा येथे मोठे नुकसान झाले होते. त्यात २४ गावांतील 584 शेतकरी बाधित होऊन 398 हेक्टरवर नुकसान झाले होते. आता पाच तालुक्यांत केळी पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांवर झाडे पडली आहेत.

  नाशिकमध्येही पावसाचा हाहाकार

  नाशिक शहर व परिसरात सलग दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसाने नाशिककरांची धांदल उडवली. नाशिकच्या ग्रामीण भागात कळवणमध्ये मौजे विसापूर येथे वीज पडून 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच सटाण्यातील केरसानेत वीज पडून बैलजोडी ठार झाली.

  वादळी पावसाने मोठे नुकसान

  नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्याने शेकडो झाडे उन्मळून पडली. तर 93 घरांची पडझड झाली असून 17 कांदाचाळी, 2 पोल्ट्री, 3 शेडनेटचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात 44 घरांचे नुकसान झाले. चांदवडमध्ये 27, नांदगाव 16 तर सिन्नर येथे 5 व नाशिक तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. मनमाड परिसरात पावसाने 4 ते 5 कांदाशेड जमीनदोस्त झाले असून, इंडियन हायस्कूलच्या खोल्यांचे पत्रे उडाले. नांदगावला 2 पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. पावसाने 7 जनावरेही दगावली. चांदवड तालुक्यातील 1 दुकान व 1 लॉन्स, तर नांदगावला 1 टपरी व शाळेचे पत्रे उडाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Jalgaon, Monsoon, Nashik

  पुढील बातम्या