नवी दिल्ली, 28 जानेवारी : आपल्या देशात आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. फळांमध्ये आंब्याला जो दर्जा दिला जातो, तो दर्जा आंब्याला हापूस प्रकारामुळे मिळाला आहे. हापूस आंबा केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे आणि आंब्याच्या हंगामात त्याला मोठी मागणी असते. आता एका इंडो-स्विस कंपनीने आंब्याची ही लोकप्रिय जात देश-विदेशात नेण्यासाठी कोकण भागातील शेतकऱ्यांच्या गटाशी भागीदारी केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 7.5 कोटी रुपये गुंतवण्याचीही कंपनीची योजना आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, इंडो-स्विस फूड अँड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म कंपनी इनोटेराने कोकण विभागातील शेतकऱ्यांसोबत भागीदारी केली आहे. कंपनी आगामी आंब्याच्या हंगामात देश आणि जगभरातील ग्राहकांना कोकण पट्ट्यातील हापूस हा GI टॅगचा आंबा पोहचवणार आहे. येत्या हंगामात कोकण विभागातून 3000 टन आंबा बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे.
कंपनी महाराष्ट्र पणन मंडळाच्या पायाभूत सुविधांचा वापर करणार
या करारानुसार, कंपनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या (MSAMB) पॅक हाऊस आणि इतर पायाभूत सुविधांचा वापर करेल. दुसरीकडे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे तांत्रिक सहाय्य कंपनीला दिले जाणार आहे.
एमएसएएमबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार म्हणाले की, कोकण विभागातील हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे. हापूससारखा दिसणारा दुसर्या प्रदेशातील आंबा हापूस म्हणून विकला जाऊ शकतो. यामुळे हापूसच्या ब्रँड नावावरच परिणाम होणार नाही तर कोकणातील आंबा बागायतदारांच्या मार्जिनवरही परिणाम होईल. अशा परिस्थितीत या कंपनीमध्ये हापूसचा जागतिक ब्रँड मजबूत करण्याची क्षमता आहे, असे पवार म्हणाले.
हे वाचा -
Insomnia : अंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय
हापूसची जगभरात निर्यात
भारतीय हापूस आंब्याला जगभरात मोठी मागणी आहे. अगदी अलीकडे अमेरिकेला हापूस आंब्याच्या निर्यातीला मान्यता मिळाली आहे. भारत आधी अमेरिकेला आंबा निर्यात करत असे, पण कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला. त्याआधी, भारताने 2019-20 या आर्थिक वर्षात 1045 मेट्रिक हापूस आंबा अमेरिकेला निर्यात केला होता, ज्याची किंमत $4.35 दशलक्ष आहे.
हे वाचा -
Budget 2022: कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार, सरकार पीक कर्जाचं टार्गेट वाढवण्याची शक्यता
केवळ अमेरिकाच नाही तर जपान, कोरिया आणि युरोपातील अनेक देशांमध्ये हापूसची निर्यात केली जाते. ऑस्ट्रेलियातही त्याची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने कोकणातील शेतकरी गटांसोबत केलेल्या भागीदारीमुळे ग्राहकांनाही फायदा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.