मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Indian Dairy Festival: दुग्ध व्यवसाय सुरु करायचाय? इथं मिळेल मोफत मार्गदर्शन

Indian Dairy Festival: दुग्ध व्यवसाय सुरु करायचाय? इथं मिळेल मोफत मार्गदर्शन

Indian Dairy Festival In Kolhapur पशुवैद्यकीय आणि दुग्ध व्यवसायातील उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे.

Indian Dairy Festival In Kolhapur पशुवैद्यकीय आणि दुग्ध व्यवसायातील उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे.

Indian Dairy Festival In Kolhapur पशुवैद्यकीय आणि दुग्ध व्यवसायातील उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 21 जानेवारी : पशुवैद्यकीय आणि दुग्ध व्यवसायातील उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना, दुग्ध संस्थांना आणि दूध प्रक्रिया संघांना एकाच छताखाली मिळत आहे. यासाठी प्रथमच कोल्हापुरात ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल-2023’ आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलमुळे शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेत आहेत.

इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या वतीने हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 20 जानेवारी पासून सुरू झालेला हा फेस्टिव्हल तीन दिवस चालणार आहे. यामध्ये खासगी व सहकारी दूध डेअरीचे प्रतिनिधी सहभागी आहेत. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि विविध डेअरी उत्पादने, यंत्रसामग्री आणि व्यवसाय योजनांचे प्रदर्शन पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन कोल्हापुरातील शाहूपुरी येथील जिमखाना मैदानावर भरवण्यात आले आहे.

काय आहे डेअरी फेस्टिव्हल-2023 मध्ये ?

या इंडियन डेअरी फेस्टिव्हलचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. यामध्ये प्रदर्शन आणि दूध परिषद असे दोन भाग आहेत. या प्रदर्शनात दुग्ध व्यवसायाशी संलग्न उद्योग जसे की गुरांचा चारा-पाणी व्यवस्थापन, गोठ्याचे व्यवस्थापन, पशुवैद्यकीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, डीएनए सेवा आणि या क्षेत्रातील काही स्टार्ट-अप्सची माहिती अशा बऱ्याच गोष्टी या डेअरी फेस्टिव्हल मध्ये बघायला मिळत आहेत. SNF आणि फॅट वाढवण्यासाठी किंवा तुमच्या दुधाची सरासरी वाढवण्यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान अशा बऱ्याच विषयांवर चर्चा सत्रे देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली असल्याचे इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी यावेळी सांगितले.

दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न

या डेअरी फेस्टिव्हल मध्ये देण्यात येणारी माहिती घेऊन, आपल्या पशूंची व्यवस्थित निगा जर राखली. तर आत्ताच्या आहे त्या दुधामध्ये 15 ते 20 टक्के सरासरी दुधाची वाढ होऊ शकते. दुग्ध व्यवसायातून मिळणारा निव्वळ नफा वाढवायचा प्रयत्न या दूध परिषदेतून करण्यात आला आहे. सध्या दुग्ध उत्पादनात भारत जगाच्या पाठीवर 22 टक्क्यांवर आहे. ते वाढवून देशाला 2023 सालापर्यंत 33 टक्क्यांवर न्यायचे असेल, तर आपल्याला या दुग्ध व्यवसायातील प्रत्येक घटकाला आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, असे मत देखील नरके यांनी व्यक्त केले आहे.

Wheat Export : सोलापूर जिल्ह्यातल्या गव्हाची देखील होऊ शकते जगभर निर्यात! पाहा Video

दरम्यान भारतात दिल्ली, गुजरात अशा ठिकाणी अनेकदा अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित केले जाते. परंतु, महाराष्ट्रात तेही कोल्हापुरात पहिल्यांदाच असे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास देखील डॉ. चेतन नरके यांनी व्यक्त केला आहे.

गुगल मॅपवरून साभार

प्रदर्शन स्थळ पत्ता 

जिमखाना मैदान, शाहूपुरी, कोल्हापूर

First published:

Tags: Agriculture, Farmer, Kolhapur, Local18