Home /News /agriculture /

 शेतकरी चिंतेत! लातूर जिल्ह्यात अद्याप 3 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक

 शेतकरी चिंतेत! लातूर जिल्ह्यात अद्याप 3 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक

लातूर जिल्ह्यात (latur) पुढचे 15 दिवस साखर कारखाने (sugar factory) सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्याना बिगर सभासद आणि सभासद यांची ऊस तोडीसाठी (sugarcane farmer) मोठी कसरत सुरू आहे

  लातूर 14 मे : राज्यात मागच्या जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त मेट्रीक टन उस गाळप शिल्लक राहिल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (sugar commissioner) यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. दरम्यान लातूर जिल्ह्यात (latur) पुढचे 15 दिवस साखर कारखाने (sugar factory) सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान बिगर सभासद आणि सभासद यांची ऊस तोडीसाठी (sugarcane farmer) मोठी कसरत सुरू आहे. मान्सून तोंडावर आल्याने राज्यात गाळप पूर्ण करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यात अद्याप तीन लाख ऊसाचे गाळप शिल्लक आहे.

  लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी जवळपासच्या गावांची परस्परात विभागणी करून घेऊन जलद ऊस गाळपाचे नियोजन करावे. मे अखेर पर्यंत कारखाने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप करावे, असे निर्देश राज्याचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख (minister amit deshmukh) यांनी दिले आहेत.

  हे ही वाचा :  Uddhav Thackeray: मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार, शिवसेनेने आखला मेगा प्लान

  जिल्ह्यातील साखर कारखान्याची गाळप क्षमता, आजपर्यंत झालेले गाळप, सध्या शिल्लक असलेला ऊस, ऊसतोडणी यंत्रणेची सदयस्थिती या संदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेत अमित देशमुख यांनी चर्चा केली. जिल्ह्यात आणखी सभासद व बिगर सभासद मिळून जवळपास 3 लाख मे. टन ऊस शिल्लक असल्याची माहिती यावेळी समोर आली.

  यावेळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री देशमुख म्हणाले, सर्व साखर कारखान्यांनी जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे नियोजन करावे, ऊसतोडणी करतांना सभासद व बिगर सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा या दृष्टीने पहावे, सोलापूर व नांदेड जिल्हातील बंद होत असलेल्या कारखान्यातील यंत्रणा तातडीने मागवून घ्यावी, शेजारी जिल्ह्यात बंद होत असलेल्या कारखान्यात हार्वेस्टरचे अधिगृहन करावे, लातूर जिल्हाधिकारी यांनी नांदेड व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तोडणी यंत्रणेच्या अधिगृहना बाबत कार्यवाही करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

  हे ही वाचा : काँग्रेसला झटका, Facebook Live करुन बड्या नेत्याचा पक्षाला Good Bye

  कारखान्याला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने अखंड वीजपूरवठा करावा, जिल्ह्यात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही असा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, आदी निर्देश या बैठकीवेळी संबंधितांना त्यांनी दिले.

  अधिक काळ कारखाने चालवल्यामुळे कारखान्याचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या वतीने साखर ऊतारा घट आणि ऊस वाहतुकीसाठी अनुदान दिले जाणार असल्याचे सांगून ऊसतोडणी यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेडमध्ये राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबनदादा शिंदे यांना आपण स्वत: बोलणार असल्याचे यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Latur, Sugarcane farmer, बाबा सिद्दीकी amit deshmukh

  पुढील बातम्या