Home /News /agriculture /

Chandrapur Farmers : 'या' जिल्ह्यातीत शेतकऱ्यांचा नादच खुळा, 5 कंपन्यांची स्थापना करत ठरले role model

Chandrapur Farmers : 'या' जिल्ह्यातीत शेतकऱ्यांचा नादच खुळा, 5 कंपन्यांची स्थापना करत ठरले role model

कोरोनानंतर (corona) जगात बरेच बदल झाले यामध्ये सर्वात मोठा बदल हा मानवाच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत होत आहे. यासाठी लोक सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळत आहेत. (organic farming)

  चंद्रपूर, 03 जून : कोरोनानंतर (corona) जगात बरेच बदल झाले यामध्ये सर्वात मोठा बदल हा मानवाच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत होत आहे. यासाठी लोक सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळत आहेत. (organic farming) दरम्यान राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनही ठाकरे सरकार देत आहे. याच उद्देशाने सेंद्रीय पध्दतीने शेती करून 3600 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाच उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. हा चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur farmers) एक अभिनव उपक्रम आहे. याचे उद्घाटन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. (minister vijay vadettiwar)

  ते म्हणाले कि, कोरोनाच्या महामारीनंतर आरोग्याच्या आणि खाण्या –पिण्याच्या सवयींबाबत जगात संशोधन सुरू आहे. सद्यस्थितीत रासायनिक व भेसळयुक्त पदार्थ खात असल्यामुळे विविध आजारांना आपणच निमंत्रण देत आहोत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने उगविलेले अन्नधान्य खाण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. याच उद्देशाने सेंद्रीय पध्दतीने शेती करून 3600 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाच उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक अभिनव उपक्रम असून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तुकूम येथे शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.

  हे ही वाचा : 'मला सगळे विचारतात की तुमचं काय होणार...', पंकजांचं स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचं विधान

  शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, या उद्देशाने 3600 शेतकरी सभासदांनी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळणे, संघटीतरित्या त्यांनी एकत्र येणे आजच्या काळाची गरज आहे. सद्यस्थितीत आपण भेसळयुक्त खात आहोत, शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने तयार केलेला माल स्वत:च विकला तर त्याचा अधिक फायदा शेतकऱ्यांना होईल असे ते म्हणाले.

  शेती क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उतरत आहेत. शेतमालावर आपणच प्रक्रिया केली तर भविष्यात एक मोठे काम उभे राहील. त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी एक मॉल किंवा जागा उपलब्ध करून देऊ. याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. कॅन्सर व इतर रोगांची उत्पत्ती कशी होते हे आपणच लोकांच्या गळी उतरविणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत जाऊन आपला माल विक्री करा, असे आवाहन मंत्र्यांनी केले.

  हे ही वाचा : Nanduarbar Drought : गाव दुष्काळात असताना शेतकरी आला धावून, 7 वर्षे स्वत:च्या शेतातील पाणी देत गावकऱ्यांची भागवली तहान

  अशा आहेत पाच उत्पादक कंपन्या : या पाचही शेतकरी उत्पादक कंपन्या सावली तालुक्यातील असून यात चंद्रपूर – गडचिरोली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (शेतकरी सभासद 1200), नास शेतकरी उत्पादक कंपनी मर्या (600), व्याहाड शेतकरी उत्पादक कंपनी (500), गेवरा शेतकरी उत्पादक कंपनी (700) आणि आसोलामेंढा शेतकरी उत्पादक कंपनी (600 सभासद) समावेश आहे. या कपंन्यामार्फत सेंद्रीय पध्दतीने पिकविलेला काळा, पिवळा व हिरवा तांदूळ, मिरची पावडर, धने, हळद पावडर, तीळ, तूप, तूर, चना, मूग डाळ, हरभरा व इतर उत्पादने आहेत. या कपंन्यासाठी नाबार्डचे सहकार्य मिळाले असून स्मार्ट प्रकल्पांतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Chandrapur, Organic farming, चंद्रपूर chandrapur

  पुढील बातम्या