मुंबई : आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा मोठा वाटा आहे. मात्र, शेतीमध्ये काही फायदा नाही, कष्टाच्या मानाने मोबदला फारच कमी मिळतो, अशी ओरड तरुणपिढीची आहे. मात्र, मध्य प्रदेशातील एक सुशिक्षित शेतकरी याला अपवाद ठरला आहे.
मध्य प्रदेशातील रीवा जिल्हा मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर बरेही हे गाव आहे. या गावातील संतकुमार सिंह नावाच्या शेतकऱ्यानं आपल्या शेतातून कोट्यवधी रुपयांचं पेरूचं उत्पादन घेतलं आहे. त्यांच्या शेतातील पेरू खरेदी करण्यासाठी प्रयागराज, मऊ(Mau), माणिकपूर, चित्रकूट, मिर्झापूर, बांदा, कौशांबी, सोनभद्र, अनपारा आदी ठिकाणचे व्यापारी एकमेकांशी स्पर्धा करतात.
संतकुमार यांच्या बागेतील 'अलाहाबादी सफेदा पेरू'ला मोठी मागणी आहे. त्यांनी पेरूची शेती कशी केली, याची माहिती घेतल्यास अनेक शेतकऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळू शकते. 'दैनिक भास्कर'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
चार एकर पडिक जमिनीत केला पेरू लागवडीचा प्रयोग
पारंपरिक शेतीला कंटाळून संतकुमार यांनी 2010मध्ये चार एकर पडिक जमिनीत पेरूची झाडं लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 50 हजार रुपये खर्च करून या जमिनीवर जवळपास एक हजार पेरूची झाडं लावली. त्यातील काही झाडांची वाढ झाली नाही.
तीन वर्षांनी (2013) राहिलेल्या झाडांमधून त्यांना उत्पन्न मिळू लागलं. नियमित धान्य उत्पादनाच्या तुलनेत पेरूच्या माध्यमातून दुप्पट कमाई झाली. त्यानंतर त्यांना पेरूच्या शेतीमध्ये जास्त रस निर्माण झाला. त्यांनी सरकारी कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीनं पेरू लागवडीचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी संतकुमार यांनी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक बागांना भेटी दिल्या. रीवा येथील कठुलिया फळ संशोधन केंद्रातूनही त्यांनी मदत मिळवली.
Union Budget 2023 : मराठवाड्यातील बळीराजाला अर्थमंत्र्यांकडून काय हवं? पाहा Video
2014 मध्ये संतकुमार रीवातील कृषी महाविद्यालयात गेले. कठुलिया परिसरात असलेल्या विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्रातील संशोधक डॉ. टी. के. सिंह यांची भेट घेतली. त्यांच्या सल्ल्यानं 22 एकर क्षेत्रात पेरूची लागवड केली. जुलै 2014 मध्ये 1500 रोपं लावली. तीन वर्षानंतर, 2017मध्ये आणखी 2000 हजार रोपं लावली. अशा प्रकारे संतकुमार यांच्याकडे एकूण 26 एकर शेतीमध्ये 4500 पेरूची झाडं आहेत.
अशी करा पेरूची शेती
पेरूची शेती करण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते. पेरूसाठी आम्लयुक्त माती सर्वात जास्त उपयुक्त असेत. या जमिनीची पीएच लेव्हल 6.5 ते 7.5 असली पाहिजे. एक रोप लावण्यासाठी खड्ड्याची लांबी, रुंदी आणि खोली एक मीटर असली पाहिजे. लाल पेरूच्या तुलनेत पांढऱ्या पेरूची लागवड जास्त योग्य ठरते. अनेक शेतकरी लखनौ 49, चित्तीदार, सुप्रीम हायब्रिड 555, रीवा-72, धारीदार, ग्वाल्हेर-27, सुरखी, सरदार, लाल पेरू अशा प्रकारच्या झाडांची लागवड करतात.
अशी करावी रोपांची लागवड
पेरूची लागवड करताना दोन रोपांमध्ये किमान सहा मीटर अंतर असलं पाहिजे. या हिशोबानुसार एका एकरमध्ये जवळपास 111 आणि एका हेक्टरमध्ये 277 रोपांची लागवड होते. शेणखत टाकलेल्या जमिनीत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पेरूची रोपं लावली पाहिजेत. उन्हाळ्याच्या दिवसात एक आठवड्याच्या फरकानं आणि थंडीच्या दिवसात 15 दिवसांच्या फरकानं रोपांना पाणी दिलं पाहिजे. लागवड झाल्यानंतर साधारण तीन वर्षांनी फळं येण्यास सुरुवात होते. उत्पादन सुरू झाल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात झाडांनी पाणी देऊ नये. या काळात झाडांची झाटणी केली पाहिजे.
Union Budget 2023 : विदर्भातील शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन? पाहा कसे थांबतील हाल? video
मिळणार उत्पादन
पेरूचं एक झाड, लावणीच्या तिसऱ्या वर्षापासून ते सातव्या वर्षापर्यंत सरासरी 20 ते 50 किलो फळं देतं. आठ ते दहा वर्षांच्या काळात एका झाडापासून एक क्विंटल उत्पादन मिळू शकतं. जर पेरूला 30 किलोप्रमाणे दर मिळाला तर एका झाडापासून सुमारे तीन हजार रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पेरूच्या झाडाचा कार्यकाळ 20 ते 25 वर्षांचा असतो. या हिशोबानं एक हेक्टर क्षेत्रातून आठ लाख 31000 हजार रुपये मिळू शकतात. मात्र, यासाठी एका पेरूचं वजन साधारण 400 ते 500 ग्रॅम असलं पाहिजे.
आपल्या पेरूच्या शेतीबद्दल बोलताना संतकुमार सांगतात, "मी देखील इतर तरुणांसारखा थोडा आळशी होतो. मला शेती करण्याची इच्छा होती, पण वडिलांप्रमाणे फार कष्ट नव्हते घ्यायचे. वडील खूप कष्ट करायचे. त्या तुलनेत उत्पन्न फार कमी मिळे. कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधत असताना पेरूचा पर्याय समोर आला. सध्या मी पेरूच्या शेतीतून एक कोटी रुपये मिळवले आहेत. मला मिळालेलं यश बघून आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनी पेरूची लागवड केली आहे. त्यामुळे भविष्यात आमचं गाव अलाहाबादप्रमाणे पेरूसाठी प्रसिद्ध होईल."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.