Home /News /agriculture /

Monsoon Update : विदर्भात जोरदार पावसाचा alert, तर राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज 

Monsoon Update : विदर्भात जोरदार पावसाचा alert, तर राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज 

मान्सूनने (monsoon update) जवळपास संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra monsoon update) व्यापला असतानाच अद्यापही राज्यात पावसाने (rain) जोर धरलेला नाही.

  मुंबई, 17 जून : मान्सूनने (monsoon update) जवळपास संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra monsoon update) व्यापला असतानाच अद्यापही राज्यात पावसाने (rain) जोर धरलेला नाही. मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. 17) कोकणात पाऊस (Konkan rain) वाढण्याची शक्यता आहे. राज्यातही पावसाला पोषक वातावरण होत आहे. विदर्भात वादळी पावसाचा, (Vidarbha rain imd alert) तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (imd) वर्तविला आहे.

  केरळात वेळेआधी मान्सून पोहोचून 31 मेपर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल 10 दिवसांनी मान्सूनने कोकणात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (11 जून) बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात मान्सून दाखल झाला. 13 जून रोजी मान्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठत निम्मा महाराष्ट्र व्यापला.

  हे ही वाचा : 'राष्ट्रपती पदासाठी देशात शरद पवारांशिवाय इतर तगडा उमेदवार उरलाय का? भाजपकडे बहुमतही नाही', राऊतांचा दावा

  बुधवारी  (ता. 15) दक्षिण मराठवाड्यात प्रगती झाली. तर गुरुवारी (ता. 16) मोठी मजल मारून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदियापर्यंत धाव घेत विदर्भाच्या बहुतांश भागात मॉन्सून पोहोचला आहे. मान्सूनने उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भाग, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भाग, संपूर्ण तेलंगणासह आंध्र प्रदेशचा बहुतांशी भागात प्रगती केली आहे.

  रविवारपर्यंत (ता. 19) मान्सून संपूर्ण विदर्भ, आंध्र प्रदेशसह बंगालचा उपसागर व्यापून छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागासह झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार, उत्तर प्रदेशमध्ये दाखल होण्यास पोषक हवामान आहे. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातही मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

  तसेच राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. पुढच्या काही तासांमध्ये कोकण, मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम, विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 24 तासांत कमाल तापमान 40 अंशांच्या खाली आले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत चंद्रपूर आणि गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

  हे ही वाचा : विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांची काँगेस नेत्यांसोबत बैठक; मुख्यमंत्री नाराज, शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटिक्स'

  पाकिस्तानातून सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला आहे. दरम्यान अरबीसमुद्रातून मान्सूनची वाटचाल योग्य असली तरी पाकिस्तानातून जोरात येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील काही भागातून मान्सूनला पुढे सरकता येत नाही. Imd ने दिलेल्या माहितीनुसार मध्यपदेशातील बडवाणीमध्ये मान्सून थांबला आहे. दरम्यान मान्सूनने वाटचाल केल्यास बडवानी आणि इंदूरऐवजी जबलपूरमार्गे महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळपासून जबलपूरमध्येही हलका पाऊस सुरू झाला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Weather, Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या