Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Sadabhau Khot : कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? सदाभाऊ खोतांचा रोष नेमका कोणावर?

Sadabhau Khot : कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? सदाभाऊ खोतांचा रोष नेमका कोणावर?

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion grower farmer) संकटात असल्याने विविध शेतकरी संघटनांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठींबा देत आहे

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion grower farmer) संकटात असल्याने विविध शेतकरी संघटनांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठींबा देत आहे

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion grower farmer) संकटात असल्याने विविध शेतकरी संघटनांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठींबा देत आहे

  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 05 जून : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion grower farmer) संकटात असल्याने विविध शेतकरी संघटनांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठींबा देत आहे. दरम्यान माजी मंत्री माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांच्या रयत क्रांती संघटनेकडून कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील (nifad tehsil rui village) रुई गावात ही कांदा परिषद घेण्यात येणार आहे. (onion council) या दरम्यान खोत यांनी कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? आजपर्यंत तरी मी ऐकलं नाही, असा घाणघात केल्याने या परिषदेत ते नेमकी काय घोषणा करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (onion rate)

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत कांदा परिषदेच्या निमीत्ताने आज नाशिक (nashik) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निर्यात बंदी, नैसर्गिक संकट आणि इतर कारणामुळे नेहमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही.

हे ही वाचा : Nafed Stop Buying Chana : नांदेडमध्ये हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक, कित्येक टन हरभराभरून ट्रक उभे

त्यामुळे निफाड तालुक्यात होणाऱ्या आजच्या कांदा परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. तर कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? आजपर्यंत तरी मी ऐकलं नाही, असा घाणघातही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला. 

कधी कांदा रडवतोय तर कधी कांदा हसवतोय. कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे कधी निर्यात बंदी तर कधी नैसर्गिक संकट उभे राहिल्याने तर कधी इतर कारणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच नाशिक जिल्हयासह राज्यात ऊस अधिक आहे. 

मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे आजच्या निफाड येथील कांदा परिषदेच्या माध्यमातून कांद्यासंदर्भात एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असून या धोरणावर विचार नाही झाला तर मग आरपारची लढाई लढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

हे ही वाचा : यंदा पंढरपूर वारी निघणारच, अजित पवार यांनी केली घोषणा

ते पुढे म्हणाले कि, जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा (onion) टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का आजपर्यंत मी तरी ऐकलं नाही. तुम्ही तरी सांगू शकता का. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूमधून कांदा वगळावा अशी आमची मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी असे सदाभाऊ खाेत यांनी येथे नमूद केले. दरम्यान राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे अशी टीका देखील खाेत यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

First published:

Tags: Farmer, Nashik, Onion, Sadabhau khot