अहमदनगर, 22 मे : हंगामाच्या सुरुवातीपासूनच अडचणीत सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांना यंदा (Grapes grower farmers) आणखी एका समस्येला सामोरे जावे लागत आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना अस्मानी संकटासोबत मानवी संकटाचा सामना शेतकरी करत आहेत. व्यापारी द्राक्षे (grapes) खरेदी करत नसल्याने अशा फळबागांमध्ये द्राक्षे सडत असल्याचे शेतकऱ्यांचे (farmer) म्हणणे आहे.
राज्यातील सोलापूर नाशिक, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे (solapur, sangli, ahamadnagar grapes farmers) जास्त उत्पादन घेतले जाते. शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी नसल्याने 70 टन द्राक्ष बागेतच खराब होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. तीच परिस्थिती सोलापूर, सांगली या जिल्ह्यातही पाहायला मिळत आहे. याशिवाय खराब हवामानामुळे बेदाणे तयार करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा : Asaam flood : आसाममध्ये महापुराचा हाहाकार 34 पैकी 31 जिल्हे पाण्याखाली, 18 जणांचा मृत्यू तर 7 लाख लोक बाधित
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील एका शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने साडेतीन एकरात द्राक्षाची बाग लावली होती. पीक पद्धतीत बदल झाल्याने उत्पादनात वाढ होईल, अशी आशा त्यांना होती. मात्र, हंगामाच्या सुरुवातीला सुरू झालेला अवकाळी पाऊस शेवटपर्यंत टप्प्याटप्प्याने कायम राहिल्याने पिकाला मोठे नुकसान पोहोचले.
परिणामी, उत्पादनात घट झाली आणि उत्पादनाची गुणवत्ता ढासळली. दरम्यान शेवटच्या टप्प्यात द्राक्षांची काढणी सुरू आहे. परंतु, व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बागेतच द्राक्षे खराब होऊ लागली आहेत. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक म्हणतात अहमदनगर जिल्ह्यात शेकडो एकर द्राक्षबागा लावल्या होत्या. मात्र, व्यापाऱ्यांअभावी द्राक्षे वाया जात आहेत. आतापर्यंत हजारो टन मालाची नासाडी झाली आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचा आरोप, व्यापाऱ्यांनी केली साठवणूक
हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काही भागात द्राक्ष काढणीला सुरुवात झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी माल बाहेर काढला होता, मात्र बदलत्या वातावरणामुळे द्राक्षांचा दर्जा चांगला नसून बाजारात मागणी नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांनी अगोदरच द्राक्षांचा साठा करून ठेवल्याने व्यापाऱ्यांनी कमी भावाने द्राक्षे खरेदी केली होती, आता व्यापारी माल घेत नाहीत. साठवलेला माल विकत असल्याने शेतकऱ्यांकडून द्राक्षे खरेदी करत नाहीत. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest