मुंबई, 08 मे : राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवण्यात येतात. दरम्यान राज्य सरकारने महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांसाठी (farmers) एक योजना आणली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 साठी 4000 कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. ही योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांच्या लागवडीवर भर देईल आणि हवामान बदलांमुळे होणार्या अडचणींमध्ये शेतकर्यांना मदत होईल या उद्देशाने काढली आहे. (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana Registration 2021)
राज्यातील ज्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 5142 खेड्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 ( Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana) सुरू झालेली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्य सरकार आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 ते 100 टक्के अनुदान दिले जाते. वर्धा जिल्ह्यातील 125 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 70 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वृक्षारोपण, फळबागा, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, भाजीपाला पिकांची पेरणी, शेळी व कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधमाशी पालन, मत्स्यपालन, कृषी आधारित उद्योग, गांडुळ खत आणि नाडेप कंपोस्ट कंपोस्ट उत्पादन युनिट, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयं-चालित यंत्रसामग्री, फळ उत्पादन यंत्रे, पीक संरक्षक साहित्य, पेरणीची उपकरणे यासाठी अनुदान दिले जाते.
कोणी सुरू केली - महाराष्ट्र सरकार
लाभार्थी - राज्यातील छोटे व मध्यम शेतकरी
लाभ - शेतकऱ्यांच्या उत्पादनात वृद्धी करणे.
अर्जाची प्रक्रिया - ऑनलाईन
विभाग - कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
ऑफिशियल वेबसाईट - http://mahapocra.gov.in
योजनेअंतर्ग 'या' शेतकऱ्यांना मिळणार फायदे
या योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूदारक शेतकर्यांना लाभ होणार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना महाराष्ट्र 2021 च्या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
राज्य सरकारकडून या योजनेसाठी आवश्यक निधी पुरवठा करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी सरकारकडून 4000 कोटी रुपयांचा निधी पुरवला गेला आहे.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यातील दुष्काळग्रस्त भाग दुष्काळमुक्त करेल. ज्यामुळे दुष्काळाने अडचणीत आलेला शेतकरी शेती करू शकेल.
ही योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात सुमारे 2800 कोटी रुपयांची आर्थिक मदत घेतली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 च्या माध्यमातून प्रथम मातीची गुणवत्ता तपासली जाईल आणि शेतकर्यांना मार्गदर्शन करून उत्पन्न वाढविण्यामध्ये सुधारणा होईल आणि शेती उत्पन्नात वाढ होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest