Home /News /agriculture /

chana crop farmer : केंद्राकडून राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी वेठीस, 44 हजार टन हरभरा खितपत

chana crop farmer : केंद्राकडून राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी वेठीस, 44 हजार टन हरभरा खितपत

केंद्राने अचानक किमान आधारभूत (chana msp) दराने हरभरा खरेदी बंद (chana crop farmer) केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

  मुंबई, 11 जून : केंद्राने अचानक किमान आधारभूत (chana msp) दराने हरभरा खरेदी बंद (chana crop farmer) केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक केंद्राकडून हरभरा खरेदी करण्याचे थांबवण्यात आले आहे. यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा बाजार (chana market) विकण्यासाठी गेल्यास हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची द्विदा अवस्था झाली आहे. दरम्यान केंद्राकडून हरभरा उत्पादकांना पुन्हा एकदा हरभरा खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली.

  केंद्र सरकारने मुदतवाढ देऊनही खरेदीची मर्यादा संपल्याने बंद असलेली हरभरा खरेदी पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी विभागाकडे केली आहे. या संदर्भात सहकार विभागाचे अपर प्रधान सचिव अनुपकुमार यांनी पत्र पाठविले आहे. 44 हजार टन हरभरा खरेदी करण्यास परवानगी द्यावी, यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

  हे ही वाचा : 'शिवसेनेचा राज्यसभेत पराभव हा NCPमुळेच, राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार', सुजय विखे पाटलांचा खळबळजनक दावा

  राज्य सरकारने पाठविलेला रब्बी अंदाज आणि केंद्र सरकारची आकडेवारी यात तफावत आहे. त्यामुळे 30 मे रोजी देण्यात आलेल्या मुदतवाढीत 8.20 लाख टनांऐवजी 7.76 लाख टन हरभरा खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला अपेक्षित असलेली 44 हजार टन खरेदी होऊ शकली नाही. परिणामी, 18 जूनपर्यंत मुदतवाढ देऊनही वाढीव कोटा लगेच पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी ठप्प झाली आहे.

  कृषी विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार, राज्यात 27.56 लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित होते. या उत्पादनाच्या 25 टक्के म्हणजे 6.89 लाख मेट्रिक टन हरभरा खरेदी करण्यास मान्यता दिली होती. 'नाफेड'कडे हरभरा खरेदीसाठी राज्यातील 5 लाख, 10 हजार 11 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 99 हजार 586 शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला. 7 जूनपर्यंत 73 लाख 43 हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला. अद्याप 1 लाख 10 हजार, 425 शेतकऱ्यांची हरभरा खरेदी प्रलंबित आहे.

  हे ही वाचा : Monsoon in Mumbai : अखेर हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरला, मुंबईत मान्सूनला सुरूवात, पुढचे चार दिवस पावसाचा alert

  कृषी विभागाच्या तिसऱ्या अंदाजानुसार राज्यात 32 लाख 83 हजार टन हरभरा उत्पादन अपेक्षित धरले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडे 8.20 लाख टन वाढीव खरेदी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र केंद्र सरकारच्या सांखिकी विभागाच्या आणि राज्य सरकारने पाठविलेल्या आकडेवारीचा ताळमेळ लागत नव्हता. त्यामुळे केंद्र सरकारने केवळ पहिल्या अंदाजावेळी दिलेले वाढीव लक्ष्य आणि पुन्हा पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानंतर केवळ 7.76 लाख मेट्रिक टन वाढीव खरेदीची मान्यता दिली. त्यामुळे 44 हजार टन कोटा कमी आल्याने हरभरा खरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

  अजित पवार काय म्हणाले

  अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी 28 जून 2022 पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम दिनांक 29 मे 2022 असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Farmer protest, Maharashtra News

  पुढील बातम्या