Home /News /agriculture /

Weather Update : यंदा पुन्हा महापूर येण्याची शक्यता, हवामान खात्याने जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज

Weather Update : यंदा पुन्हा महापूर येण्याची शक्यता, हवामान खात्याने जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज

मागच्या दोन महिन्यांपूर्वी हवामान खात्याने (imd alert) 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. परंतु जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसह (farmer) सगळेच हवालदिल झाले होते.

  पुणे, 02 जुलै : यंदा जून महिन्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाऊस पडेल (Weather Update) की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपूर्वी हवामान खात्याने (imd alert) 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. परंतु जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसह (farmer) सगळेच हवालदिल झाले होते. हवामान खात्याचा अंदाज चुकला तर शेतकऱ्यांना याचा जास्त फटका बसणार आहे. दरम्यान (It will receive 96 to 106 per cent rainfall in July) जुलै महिन्यात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे.

  जुलै महिन्यात देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी जाहीर केला. या अंदाजामध्ये कमी अधिक पाच टक्के फरक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 98 ते 102 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यानुसार देशात 96 ते 106 टक्के पाऊस या महिन्यात पडेल.

  महाराष्ट्रात चांगला पाऊस

  जुलैमध्ये देशात सुमारे 280 मि.मी. पाऊस पडण्याचा अंदाज 1971 ते 2020 या वर्षांत पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात 98 ते 102 टक्के पावसाची शक्यता आहे.

  बंगालच्या उपसागरातून (Bay of Bengal) सक्रीय होत कोकण किनारपट्टीवरून (konkan rainfall) आसाम, पश्चिम बंगाल, ओडिसा (assam, west bengal, odisha heavy rainfall monsoon) या राज्यात मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनचा पाऊस (monsoon update) सुरू आहे. दरम्यान काही राज्यात अद्यापही मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. तर देशातील अनेक राज्यात मान्सूनची वाटचाल जोरदार सुरू झाली आहे. उत्तरेतील काही राज्यात मान्सून अद्यापही सक्रीय नव्हता परंतु मागच्या दोन दिवसांपासून मान्सून (weather update) पावसाला सुरूवात झाली आहे.

  देशातील कित्येक राज्यात मान्सून (monsoon update) सक्रिय (Heavy Rainfall) झाला आहे. ज्या पावसाने हजेरील लावलेली नाही त्या भागात पुढच्या दोन दिवसांत पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. मुंबई, राजस्थानात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही अडीच तासांत धुवाधार पावसाने झोडपले झाला.

  हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्यप्रदेश, राजस्थानसह 11 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, महाराष्ट्र, गोवा उत्तर कर्नाटक, उत्तर केरळ येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब-हरियाणा येथे मध्यम आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस होईल.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Rain flood, Weather, Weather forecast, Weather warnings

  पुढील बातम्या