Home /News /agriculture /

आयकर भरणारेही घेत होते pm kisan samman nidhi, कारवाईच्या भीतीने 185 शेतकऱ्यांनी लाखो रुपये केले परत

आयकर भरणारेही घेत होते pm kisan samman nidhi, कारवाईच्या भीतीने 185 शेतकऱ्यांनी लाखो रुपये केले परत

योगी सरकारने अपात्र असुनही पीएम किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi) घेणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. झाशीतील 185 बनावट आणि अपात्र शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत मिळालेली रक्कम सरकारला परत केली आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 07 मे: पीएम किसान सन्मान निधीसाठी (pm kisan samman nidhi) अपात्र असुनही काहीजण लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान योगी सरकारने (yogi adityanath government) पीएम किसानसाठी अपात्र असलेल्या शेतकऱ्यांना चांगलच कामाला लावलं आहे. योगी सरकारने अपात्र असुनही पीएम किसान सन्मान निधी घेणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. झाशीतील 185 बनावट आणि अपात्र शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत मिळालेली रक्कम सरकारला परत केली आहे.

  झाशी जिल्ह्यातील 2 हजार 489 शेतकरी अपात्र ठरवून त्यांना रक्कम परत करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यातील लाभार्थ्यांची शासकीय स्तरावर चौकशी केली असता, टॅक्स भरणारे 2 हजार 489 शेतकरी असल्याचे समोर आले. तसेच या योजनेचा लाभ घेत आहेत. हे सर्व अपात्र ठरवून त्यांना नोटीस पाठवून पैसे परत पाठविण्यास सांगितले आहे. 

  हे ही वाचा : IIT Bombay ला मिळाले दोन फ्लॅट, माजी प्रोफेसरच्या कुटुंबियांनी घेतला कौतुकास्पद निर्णय

  कारवाईच्या भीतीने झाशी जिल्ह्यातील 185 अपात्र शेतकऱ्यांनी आतापर्यंत 12 लाख रुपये परत केले आहेत. पैसे परत करणाऱ्या शेतकऱ्यांवर यापुढे कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नोटीस मिळाल्यानंतरही अद्याप रक्कम परत न केलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली व पुढील कारवाईची तयारी सुरू आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

  नोटिसा बजावल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता मिळत राहिला, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा कृषी अधिकारी केके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे शेतकरी आयकर अंतर्गत येतात आणि सन्मान निधी देखील घेत होते, त्यांना नोटीस बजावून रक्कम परत करण्यास सांगण्यात आले होते. कृषी विभागाने वसुलीसाठी यादी तयार केली असून आतापर्यंत 185 अपात्र शेतकऱ्यांकडून 12 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. स्वेच्छेने रक्कम परत न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.

  हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क 

  पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

  पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261

  पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401

  पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606

  पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109

  ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: PM Kisan, Pm modi, Uttar pardesh, Yogi Aadityanath

  पुढील बातम्या