मराठी बातम्या /बातम्या /agriculture /शेतकऱ्यांना या योजनेतून मिळू शकतं कोणत्याही हमीशिवाय 1.60 लाखांचं कर्ज

शेतकऱ्यांना या योजनेतून मिळू शकतं कोणत्याही हमीशिवाय 1.60 लाखांचं कर्ज

या योजनेच्या माध्यमातून गाय, म्हैस, मेंढी, शेळी आणि कोंबडी पालनासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे. या योजनेतून 1.60 लाख रुपये मिळवण्यासाठी कोणत्याही हमीची (Guarantee) गरज नाही.

या योजनेच्या माध्यमातून गाय, म्हैस, मेंढी, शेळी आणि कोंबडी पालनासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे. या योजनेतून 1.60 लाख रुपये मिळवण्यासाठी कोणत्याही हमीची (Guarantee) गरज नाही.

या योजनेच्या माध्यमातून गाय, म्हैस, मेंढी, शेळी आणि कोंबडी पालनासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे. या योजनेतून 1.60 लाख रुपये मिळवण्यासाठी कोणत्याही हमीची (Guarantee) गरज नाही.

  नवी दिल्ली, 04 डिसेंबर : तुम्ही शेतकरी (Farmer) असाल आणि कर्ज (Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) ही योजना सुरू करण्यात आली आहे. पशु किसान क्रेडिट कार्डचे नियम मोदी सरकारच्या (Modi Government) किसान क्रेडिट कार्ड योजनेसारखेच आहेत. या योजनेच्या माध्यमातून गाय, म्हैस, मेंढी, शेळी आणि कोंबडी पालनासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे. या योजनेतून 1.60 लाख रुपये मिळवण्यासाठी कोणत्याही हमीची (Guarantee) गरज नाही.

  पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना दिला जाईल, असं आश्वासन बॅंकर्स समितीनं केंद्र सरकारला दिलं आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी बॅंकांनी शिबिरं (Camp) आयोजित करावीत; पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये विशेष होर्डिंग्ज लावून पशुवैद्यकांनी या योजनेची माहिती पशुपालक शेतकऱ्यांना द्यावी, असं सांगण्यात आलं आहे. राज्यात सुमारे 16 लाख कुटुंबांकडे दुभती जनावरं असून, त्यांचं टॅगिंग करण्यात येत आहे.

  गाय (Cow) आणि म्हशींकरिता (Buffalo) किती पैसे मिळतील?

  - या योजनेंतर्गत गायीसाठी 40,783 रुपये देण्याची तरतूद आहे.

  - म्हशीसाठी 60,249 रुपये देण्याची तरतूद आहे.

  - शेळी आणि मेंढीसाठी 4063 रुपये मिळतील.

  - कोंबडीसाठी (अंडी देणाऱ्या) 720 रुपयांचं कर्ज दिलं जाईल.

  या कार्डसाठी पात्रता काय असेल?

  - अर्जदार शेतकरी हरियाणा (Haryana) राज्यातील कायमचा रहिवासी असावा.

  - अर्जदाराकडे आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड (Pan Card), व्होटर आयडी कार्ड (Voter ID Card) असावं.

  - अर्जदाराकडे मोबाइल क्रमांक असणं आवश्यक आहे.

  - अर्ज करण्याकरिता पासपोर्ट साइज फोटो गरजेचे आहेत.

  हे वाचा - SBI Green Car Loan: इलेक्ट्रिक वाहनांसाठी एसबीआयकडून स्वस्त दरात कर्ज

  व्याज किती असेल?

  - बॅंका सुमारे 7 टक्के व्याजदरानं (Interest) कर्ज उपलब्ध करून देतात.

  - पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना केवळ 4 टक्के व्याज द्यावं लागेल.

  - केंद्र सरकारकडून 3 टक्के सूट देण्याची तरतूद आहे.

  - कर्जाची कमाल रक्कम 3 लाखांपर्यंत असेल.

  हे वाचा - Mutual फंडात गुंतवणूक करण्यासाठी किती रकमेची गरज असते? जाणून घ्या सर्व शंका

  असा करा अर्ज

  - हरियाणा राज्यातले जे इच्छुक लाभार्थी या योजनेंतर्गत पशू किसान क्रेडिट कार्ड घेऊ इच्छितात, त्यांनी नजीकच्या बॅंकेत जाऊन अर्ज भरणं आवश्यक आहे.

  - बॅंकेत जाताना सोबत सर्व आवश्यक कागदपत्रं असणं आवश्यक आहे.

  - अर्ज भरल्यानंतर तुम्हाला केवायसी (KYC) करावं लागेल. केवायसीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, व्होटर कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो देणं आवश्यक आहे.

  - बॅंकेकडून केवायसी झाल्यानंतर आणि अर्जाची पडताळणी केल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला पशू किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

  First published:
  top videos

   Tags: Farmer, Scheme