मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Farmer Suicide: राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबेनात, फक्त मराठवाड्यातील इतकी विदारक स्थिती

Farmer Suicide: राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबेनात, फक्त मराठवाड्यातील इतकी विदारक स्थिती

गेल्या वर्षी या भागातील 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी 617 जणांना नुकसान भरपाई मिळाली. तर, 110 आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली नाहीत. उर्वरित प्रकरणाचा तपास प्रलंबित होता.

गेल्या वर्षी या भागातील 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी 617 जणांना नुकसान भरपाई मिळाली. तर, 110 आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली नाहीत. उर्वरित प्रकरणाचा तपास प्रलंबित होता.

गेल्या वर्षी या भागातील 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी 617 जणांना नुकसान भरपाई मिळाली. तर, 110 आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली नाहीत. उर्वरित प्रकरणाचा तपास प्रलंबित होता.

    मुंबई, 22 डिसेंबर : महाराष्ट्र सरकारने अलीकडच्या वर्षांत सलग दोन वर्षं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत राज्यातील एकट्या मराठवाड्यात 805 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे (Farmer Suicide cases) येतात. शेतकरी आत्महत्यांच्या 805 प्रकरणांपैकी 605 प्रकरणे नुकसान भरपाईसाठी पात्र मानली गेली तर 84 प्रकरणं नुकसान भरपाईसाठी योग्य ठरवली नाहीत. तर, 115 प्रकरणांचा तपास सुरू आहे की हे प्रकरण शेतकरी आत्महत्येचे होते किंवा नाही? 'टीव्ही 9'ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी या भागातील 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी 617 जणांना नुकसान भरपाई मिळाली. तर, 110 आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली नाहीत. उर्वरित प्रकरणाचा तपास प्रलंबित होता. 2019 मध्ये शेतकरी आत्महत्येच्या 937 प्रकरणांची नोंद झाली आहे. सलग चार वर्षं शेतकऱ्यांना बसला फटका 2017 मध्ये राज्य सरकारनं पहिल्यांदाच कर्जमाफी केल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. त्यानंतर सलग दोन वर्षं या भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतरची दोन वर्षं कोरोनाच्या साथीनं शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळं या चार वर्षांत लाखो टन पिकं, फळं आणि भाजीपाला कुजला किंवा नष्ट झाला. शेतकरी आत्महत्यांमागे मायक्रो फायनान्स कंपन्यांचाही हात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2017 नंतर 25 फेब्रुवारी 2020 रोजी महाविकास आघाडी सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. सरकारने 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2020 पर्यंत घेतलेलं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं. या कर्जमाफीचा एकूण 19 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला. हे वाचा - Black carrots : कधी खाल्लं आहे का काळं गाजर; जीवघेण्या कॅन्सरवरदेखील आहे प्रभावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा उपाय नाही. हा केवळ वरवरचा उपाय आहे. शेतकरी जेवढी गुंतवणूक शेतीत करतात, त्यापेक्षा कमाई कमी असते. यामुळं ते नेहमी ऋणात किंवा कर्जात राहतात. एमएसपीवरील हमी हा या समस्येवरचा उपाय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे वाचा - मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना; ग्रामपंचायतींना या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शेतकरी कार्यकर्ते जयाजीराव सूर्यवंशी म्हणतात की, राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगणा मॉडेल लागू केलं पाहिजे. तेलंगणा सरकार खतं आणि बियाणं खरेदीसाठी प्रति एकर 10,000 रुपये मदत देतं. ते म्हणाले की, दोन वर्ष अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या कोविड महामारीमुळं कर्जमाफी निष्फळ झाली. तसं झालं नसतं तर परिस्थिती वेगळी असती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Agriculture, Organic farming

    पुढील बातम्या