Home /News /agriculture /

राज्यातील या बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला मोठा निर्णय, मिळेल असा फायदा

राज्यातील या बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला मोठा निर्णय, मिळेल असा फायदा

गेल्या दोन आठवड्यांपासून यासाठी नोंदणी सुरू आहे. आता खरेदीही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजारात असा उपक्रम घेण्यात यावा, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

    मुंबई, 02 जानेवारी : शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यानं कृषी उत्पादनात वाढ (Agricultural Produce) होत असली तरी उत्पादन वाढीचा लाभ बहुतेक वेळा शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना आपला माल अत्यंत कमी भावात विकावा लागतो. खरेदी न होणं आणि चांगला भाव न मिळणं ही शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यात असलेल्या एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीनं ज्वारी आणि मका खरेदीला हमीभाव देण्याचा निर्णय तर घेतलाय. त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Erandol Agricultural Produce Market Committee) मिळाला आहे. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून यासाठी नोंदणी सुरू आहे. आता खरेदीही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजारात असा उपक्रम घेण्यात यावा, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ज्वारी व मका खरेदीची हमी भरडधान्य उत्पादनावर केंद्र सरकारचे लक्ष आहे. 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलंय. मात्र, अशा धान्याची खरेदी न झाल्यानं व भाव मिळत नसल्यानं शेतकरी लागवड कमी करत आहेत. ज्वारीचं क्षेत्र कमी होत आहे. अशा परिस्थितीत एरंडोल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीनं धाडसी निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये ज्वारी 2 हजार 738 रुपये आणि मका 1 हजार 870 रुपये प्रतिक्विंटल दरानं खरेदी करण्याची हमी देण्यात आली आहे. ज्वारी आणि मक्याची खरेदी जोरात सुरू झाली आहे. हे वाचा - Fake PAN Card: बनावट PAN Card असं ओळखा; या सोप्या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या जाणून घ्या ऑनलाइन नोंदणी केली जाईल चांगल्या भावासाठी शेतकरी संघटनेनं पुढाकार घेतला आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी आणि मका पिकाला योग्य भाव मिळणार आहे. शेतकऱ्यांना थेट खरेदी केंद्रावर शेतमाल न आणता प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाइन नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांना आधार कार्डची माहिती द्यावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 407 शेतकऱ्यांनी मक्यासाठी नोंदणी केली आहे. याचा फायदा एरंडोल व धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. हे वाचा - मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना; ग्रामपंचायतींना या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर पिकांना रास्त भाव कधी मिळणार? सध्या एरंडोल उपसमितीत कृषी मालाची खरेदी-विक्री सुरू आहे. अन्य मंडईंमध्येही असा उपक्रम राबविल्यास शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही हमीभाव आणि रास्त भाव हवा आहे. त्यांची ही मागणी कधी पूर्ण होते हे येत्या काळात स्पष्ट होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Agriculture, Farmer

    पुढील बातम्या