Home /News /agriculture /

Monsoon Update : मान्सून पूर्व पावसाने निम्मा महाराष्ट्र पाण्यात, मुंबईला मान्सूनची चाहूल

Monsoon Update : मान्सून पूर्व पावसाने निम्मा महाराष्ट्र पाण्यात, मुंबईला मान्सूनची चाहूल

सोलापूर, नाशिक, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, या जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (pre monsoon rain)

  मुंबई, 10 जून : राज्यात मान्सून लांबणीवर (Maharashtra monsoon) पडणार अशी चर्चा सुरु असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (imd) या सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचेल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान राज्यात कालपासून मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) राज्यात जोरदार पाऊस झाला. पुणे, सातारा, मुंबई आणि उपनगरे, नागपूर, यवतमाळ, नाशिक, बुलढाणा, वाशिम, यासह अन्य जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.  (heavy rain Maharashtra) दरम्यान यामुळे अनेक जिल्ह्यात गावांमध्ये शेतीच्या कामे खोळांबली आहेत तर काही भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान सोलापूर, नाशिक, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, या जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य केळी या पिकाला मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर केळीच्या बागा वादळी पावसाने उन्मळून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. (Monsoon Update)

  हे ही वाचा : Rajya Sabha Election: 4 राज्ये, 16 जागा; आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान

  यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जोरात होता. या तडाख्यातच दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावासाने एन्ट्री केली. जवळपास आरद्या तासाच्या पावसाने पाणी पाणी झाले होते. वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामांना वेग आला आहे. नागपूरच्या काही भागात रिमझिम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली. सकाळ पासून कडक उन्ह मात्र दुपार नंतर पावसाचे वातावरण झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील व परिसरातील, हिवरा आश्रम, बेलगाव, जानेफळ या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह एक तास मुसळधार पाऊस बरसला. 

  ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली. दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. रायगडमधील माणगाव, महाड, गोरेगाव भागात पाऊसाने जोरदार बॅटींग केली. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. मान्सूनपूर्व पावसाचे कोकणातील काही भागातही आगमन झाले.  कोकणातील काही भागात तुरळक पाऊस पडला. मान्सूनची तारीख ठरली 31 मे ते 7 जून दरम्यान मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापल्याचे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले. मान्सूनच्या वाटचालीस कोणताही विलंब झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबई व्यापेल, हवामान विभागाचे अधिकारी जेनामनी म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Maharashtra News, Monsoon, Mumbai rain, Weather, Weather forecast

  पुढील बातम्या