मुंबई, 20 मे : राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे दरम्यान हा पाऊस कदाचित हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस (Pre-monsoon rains) असल्याने कदाचित हा पाऊस (rain) थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. दरम्यान आज कृषी मंत्री दादा भुसे (minister dada bhuse) यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
ते म्हणाले की, खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 151.33 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ही त्यांनी भुसे यांनी दिल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पुरेसा पाऊस होणार आहे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
हे ही वाचा : heavy rain kolhapur : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत
शेतमाल निर्यातीसाठी असलेल्या मालाच्या दर्जा तपासणी (ट्रेसिबिलीटी) नोंदणीच्या प्रणालीमध्ये देशातील 72,280 शेतकऱ्यांपैकी महाराष्ट्रातील 62,344 शेतकरी आहेत. भारतातील 129 भौगोलिक मानांकनापैकी महाराष्ट्रातील 26 आहेत. देशात भौगोलिक मानांकन नोंदणीकृत शेतकरी 5,260 आहेत. त्यापैकी 4390 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.
महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी, कांदा, मिरची या पिकांच्या निर्यातीत आघाडीवर आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या 65 टक्के फळे, 55 टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. देशात सर्वाधिक 4500 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत (पीएमएफएमई) महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही आपल्या महाराष्ट्राची बलस्थाने असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाची रिपरिप
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, या जिल्ह्यात (kolhapur, sangli heavy rain) पावसाने जोरदार हजेरी लावली. (heavy rain fall) हवामान खात्याच्या माहितीनुसार गोवा, कर्नाटकमार्गे वारे वाहत असल्याने कोल्हापूर सांगली आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून alert जारी करण्यात आला होता. दरम्यान काल (दि.19) संध्याकाळपासून कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. (weather alert)
मान्सून या दिवशी होणार सक्रिय होणार
दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात मान्सूनची वाटचाल सुरू आहे आहे.
राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Monsoon, Weather, Weather forecast, शेतकरी