Home /News /agriculture /

Groundwater Level : राज्याच्या भूजल पातळीत घट, यंदा पाऊस न झाल्यास भीषण परिस्थिती

Groundwater Level : राज्याच्या भूजल पातळीत घट, यंदा पाऊस न झाल्यास भीषण परिस्थिती

राज्यात मान्सून (Monsoon) यंदा लवकर आगमन करणार अशी माहिती हवामान खात्याकडून (imd) देण्यात आली परंतु हवामान खात्याचा अदाज फोल ठरत चालल्याचे दिसून येत आहे. (Groundwater level)

  मुंबई, 03 जुलै : राज्यात मान्सून (Monsoon) यंदा लवकर आगमन करणार अशी माहिती हवामान खात्याकडून (imd) देण्यात आली परंतु हवामान खात्याचा अदाज फोल ठरत चालल्याचे दिसून येत आहे. राज्यात जून महिना कोरडाच गेला असून अद्याप पावसाने दमदार हजेरी लावली नाही. कोकण (Konkan) आणि काही भाग सोडला तर राज्यातील कित्येक भागात पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. राज्यात पाऊस (Maharashtra rain update) नसल्याने भूजल पातळीत (Groundwater level) अजूनही वाढ झालेली नाही. राज्यातील पुणे, सातारा, नंदुरबार, जळगाव, धुळे, अमरावती या जिल्ह्यातील तब्बल 194 गावांतील भूजल पातळीत एक मिटरहून अधिक घट झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस न झाल्यास ही भूजल पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता (Groundwater levels are likely to go even deeper) आहे. असल्याचे वरिष्ठानी दैनिक अॅग्रोवनला माहिती दिली.

  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या विहिरींमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे सप्टेंबरअखेर राज्यात पर्जन्यमान व ऑक्टोबरमधील भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत संभाव्य अनुमान काढले जात असल्याची माहिती भूजल अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

  हे ही वाचा : Assembly Speaker Election : निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का, 2 मतं झाली कमी

  गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 अखेर 355 पैकी 270 तालुक्यांतील 85 तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पावसात घट आढळून आलेली होती. पर्जन्यमानाचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत असल्यामुळे त्याचा परिणाम सप्टेंबर 2021 अखेर 3660 निरिक्षण विहिरींद्वारे मोजण्यात आलेल्या भूजल पातळीच्या अभ्यासाआधारे राज्यातील 268 गावांमध्ये सरासरीच्या तुलनेत 1 मीटर पेक्षा जास्त भूजल पातळी खालावलेली आढळली असल्याचे दिसून आले. त्यापैकी 17 गावांमधील भूजल पातळीमध्ये 3 मीटर पेक्षा जास्त घट, 38 गावांमध्ये 2 ते 3 मीटर, तर 213 गावांमधील भूजल पातळीत 1 ते 2 मीटर एवढी घट आढळली.

  यंदा मार्च 2022 मधील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीतील भूजल पातळीशी करण्यात आला. विविध कामासाठी झालेला भूजल उपसा व त्यामुळे भूजल पातळीत झालेला बदल या बाबतची माहिती मार्च 2022 मध्ये निरिक्षण विहिरींमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरून दिसून येते. मार्च 2022 अखेर निरिक्षण विहिरींमधील भूजल पातळीच्या घेतलेल्या नोंदीची तुलना मागील पाच वर्षांच्या जानेवारीमधील भूजल पातळीच्या सरासरीशी केली असता, राज्यातील एकूण निरिक्षण विहिरींपैकी 2978 विहिरींमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ, तर 720 निरिक्षण विहिरींमधील भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली. 

  हे ही वाचा : शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच..! कारवाई मागे

  यापैकी 18 निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त, 33 निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटर, 199 निरिक्षण विहिरीत 1 ते 2 मीटर, तर 550 निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 0 ते 1 मीटर एवढी घट आढळून आली. मार्च 2022 अखेरील निरिक्षण विहिरींतील स्थिर भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाआधारे अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमानाच्या 6 जिल्ह्यांतील 9 तालुक्यातील निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 1 मीटर पेक्षा जास्त घट आढळून आली. यामुळे 9 तालुक्यांतील साधारणत: 114 गावांमध्ये पाणीटंचाई सदृश परिस्थितीचे निष्कर्ष काढले आहेत. याबाबत संबंधित माहिती दैनिक अॅग्रोवनने दिली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Maharashtra News, Water crisis

  पुढील बातम्या