Home /News /agriculture /

आठवड्याभरात कापसाच्या दरात मोठी तेजी, शेतकऱ्यांच्या दारात जाऊनही व्यापाऱ्यांना कापूस मिळेना

आठवड्याभरात कापसाच्या दरात मोठी तेजी, शेतकऱ्यांच्या दारात जाऊनही व्यापाऱ्यांना कापूस मिळेना

मात्र, यावर्षी वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीमुळं कापसाच्या नुकसानीतही मोठी वाढ झाली आहे. कापसाला (Cotton) मागणी आहे, कापसाची मागणी वाढल्यानं भावात वाढ झाली आहे.

  मुंबई, 11 नोव्हेंबर : कापसाचे वाढते भाव (Cotton Rate in Maharashtra) राज्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात कापसाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. मागणी वाढल्याने आणि मर्यादित पुरवठा असल्यामुळं भविष्यात कापसाचे दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, यावर्षी वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीमुळं कापसाच्या नुकसानीतही मोठी वाढ झाली आहे. कापसाला (Cotton) मागणी आहे, कापसाची मागणी वाढल्यानं भावात वाढ झाली आहे. खान्देशात कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र, यंदा या भागात अनेक ठिकाणी कापसाऐवजी सोयाबीनचे (Soybean) उत्पादन घेण्यात आलं. कापूस बोतण्याच्या वेळी पावसानं हजेरी लावली. अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले असून वातावरणातील बदलामुळे उत्पादनातही घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या दारात जाऊन खरेदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असल्यानं त्याचा भाव 9000 रुपयांपर्यंत गेला आहे. मात्र, पावसामुळं उत्पादनात मोठी घट झालीय. त्यामुळं कापूस उत्पादक चांगला भाव मिळाल्याशिवाय विक्री करणार नाहीत. लागवडीपासून कापणीपर्यंतचा खर्चाचा उत्पादक शेतकरी हिशोब करत आहेत. मागणी जास्त असल्याने व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कापसाची खरेदी करत असले तरी अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. हे वाचा - आतापर्यंत एसटीच्या 2053 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन; पुण्यातील आकडा सर्वाधिक गेल्या आठ दिवसांपासून कापसाचे दर तेजीत आहेत.त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी 5,200 रुपये प्रतिक्विंटल असलेला कापूस आज 9,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आता गावागावात फेऱ्या मारूनही कापूस मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे भविष्यात दर वाढल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कापसाचे राज्यातील विविध बाजार समित्यांमधील दर -
  दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
  11/11/2021बुलढाणालोकलनग1250820083508350
  11/11/2021चंद्रपुरए.एच ६८ - लांब स्टेपलक्विंटल1060787579857925
  11/11/2021हिंगोलीलोकलक्विंटल57700080007500
  11/11/2021नागपूरएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल60520052155205
  11/11/2021नांदेड---क्विंटल47790080007950
  11/11/2021नांदेडमध्यम स्टेपलक्विंटल60790080007950
  11/11/2021वर्धामध्यम स्टेपलक्विंटल45364794283708175
  11/11/2021यवतमाळएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल230770080507800
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)46878
  कापसाची मागणी वाढल्यानं भावात वाढ झाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Agriculture, Farmer

  पुढील बातम्या