मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Uddhav Thackeray : ऊस उत्पादक शेतकरी करतोय आत्महत्या; पण साखर परिषदेत शिल्लक उसाबाबत मुख्यमंत्र्यांचं मौनच!

Uddhav Thackeray : ऊस उत्पादक शेतकरी करतोय आत्महत्या; पण साखर परिषदेत शिल्लक उसाबाबत मुख्यमंत्र्यांचं मौनच!

राज्यात यंदाचा उसाचा हंगाम अद्यापही सुरू आहे. लाखो टन ऊस गाळपाविना राहिला आहे. (sugarcane farmer) मात्र यंदाच्या साखर परिषदेत उद्धव ठाकरे काय भुमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. (Uddhav Thackeray)

राज्यात यंदाचा उसाचा हंगाम अद्यापही सुरू आहे. लाखो टन ऊस गाळपाविना राहिला आहे. (sugarcane farmer) मात्र यंदाच्या साखर परिषदेत उद्धव ठाकरे काय भुमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. (Uddhav Thackeray)

राज्यात यंदाचा उसाचा हंगाम अद्यापही सुरू आहे. लाखो टन ऊस गाळपाविना राहिला आहे. (sugarcane farmer) मात्र यंदाच्या साखर परिषदेत उद्धव ठाकरे काय भुमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. (Uddhav Thackeray)

  पुणे, 04 जून : राज्यात यंदाचा उसाचा हंगाम अद्यापही सुरू आहे. लाखो टन ऊस गाळपाविना राहिला आहे. (sugarcane farmer) याचबरोबर आपल्या शेतातील ऊस जात नसल्याच्या निराशेतून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आहे. (sugarcane farmer suicide) राज्यात अद्याप 3 लाख  टन ऊस गाळप राहिले आहे. तर शिल्लक राहिलेल्या उसाला राज्य सरकारकडून 200 रुपये जादा दर देण्याचे ठरले आहे. परंतु पुण्यात आज (दि 04) वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट (vasantdada sugar institute) येथे साखर परिषद (pune Sugar Council) आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिल्लक उसाबाबत भाष्य करणे टाळल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

  मुख्यमंत्री म्हणाले कि, केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. तसेच साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

  हे ही वाचा : Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला अखेर परवानगी, सभेसाठी पोलिसांच्या 16 अटी-शर्थी

  आपला शेतकरी कष्टासाठी मागे पडत नाही. आपला कृषिप्रधान देश आहे. साखर, इथेनॉलच्या मागणीबाबत बाजाराचा अभ्यास करून कोणते उत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी याचे  मार्गदर्शन करावे लागेल. त्याच्या कष्टाला योग्य किंमत मिळावी यासाठी योग्य दिशा द्यावी लागेल. राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

  साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे

  साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन  पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व लक्षात घेता त्याच्या निर्मितीवरही विशेष लक्ष द्यावे लागेल. ऊसतोड कामगार, शेतकरी, साखर कारखानदार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतील तर त्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. साखर कारखाने तोट्यात चालत असताना उद्योगाच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. साखर परिषदेमध्ये या उद्योगातील समस्यांवर विचार व्हावा. शेतकऱ्यांनी उसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.

  हे ही वाचा : तहसीलदाराचं धक्कादायक कृत्य, पत्नी-मुलांना केली रॉड आणि हॉकी स्टिकनं मारहाण

  ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखर परिषदेमध्ये अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती सहभागी झाल्याने ही परिषद या क्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  राज्यात अद्यापही 3 लाख ऊस गाळपाविना

  मान्सून पूर्व पावसाने राज्यात धुमाकूळ सुरू असताना अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरुच आहेत. महाराष्ट्रात 25 च्यावर साखर कारखान्यांची धुराडी अद्यापही पेटलेली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा माल शेतात वाळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

  दरम्यान  राज्यात यंदाच्या हंगामात 31 मेअखेर 3.75 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. त्यातील 2.80 लाख टन ऊस एकट्या मराठवाड्यातील असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी अॅग्रोवनशी बोलताना दिली.जून उजाडला तरीही उसाची वेळेत तोड होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर उसाचे एक टिपरूही गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

  राज्यात साखर कारखान्यांनी 1 जून अखेर 1316.8 लाख टन उसाचे गाळप केले असून 1369.61 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यातील गाळप केलेल्या कारखान्यांचा 10.4 टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर राज्यात 26 कारखान्यांकडून अद्याप उसाचे गाळप सुरू आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Sugar facrtory, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Uddhav tahckeray

  पुढील बातम्या