Home /News /agriculture /

Centre bans wheat export : मोदी सरकारचा अचानक मोठा निर्णय, गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी

Centre bans wheat export : मोदी सरकारचा अचानक मोठा निर्णय, गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी

केंद्रातील मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. (Centre bans wheat export with immediate effect) गहू उत्पादन, सरकारी खरेदीबाबत केंद्र सरकारकडून सुधारित अंदाज जारी करण्यात आला.

  नवी दिल्ली, 14 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी तीन दिवसांचा युरोप दौरा केला. यानंतर भारतात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच (5 मे) गहू पुरवठा, साठवणूक, निर्यातीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. दरम्यान आज अचानक केंद्रातील मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे (Centre bans wheat export with immediate effect).

  गहू उत्पादन, सरकारी खरेदीबाबत केंद्र सरकारकडून सुधारित अंदाज जारी करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून गव्हाचा पुरवठा, साठवणूक आणि निर्यातीचा आढावा घेण्यात आला. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढत्या किमती पाहता सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, काही अटींसह गव्हाची निर्यात सुरू राहणार आहे. यापुर्वी ज्या देशासोबत करार झाला आहे त्या देशांना आजचे नियम लागू होणार नाहीत. याबाबत सरकारने तशा सूचना केल्या आहेत.

  हे ही वाचा : PF संबंधित काही तक्रार असल्यास ऑफिसला फेऱ्या मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन होईल काम; चेक करा प्रोसेस

  अधिसूचनेच्या जारी केलेल्या पत्रात शेजारी देश आणि इतर असुरक्षित देशांची अन्न सुरक्षा (food safety) धोक्यात आहे. देशाची एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी आणि शेजारी आणि इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. भारत सरकार शेजारी आणि इतर असुरक्षित विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यांचा जागतिक गहू बाजारातील अचानक बदलांमुळे विपरित परिणाम होतो आणि पुरेसा गव्हाचा पुरवठा होऊ शकत नाही असे म्हटले आहे.

  मार्च ते एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादन घटल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. सरकारी खरेदी केंद्रावरील परिस्थिती, गहू निर्यातीबद्दल (wheat export) त्यांना अवगत करून देण्यात आले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. गव्हाची सरकारी खरेदी १ कोटी ९५ लाख टन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने ४ मे २०२२ रोजी वर्तवला आहे. निर्धारित ७५ लाख टन गहू साठ्याच्या तुलनेत भारताकडे ८० लाख टन गव्हाचा उपलब्ध असणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Pm modi

  पुढील बातम्या