मुंबई, 25 जून : कोकणात काजू (Konkan cashew nuts) बोंड्यांपासून मद्य तयार केले जाते. प्रामुख्याने कोकणात हा व्यवसाय (Konkan cashew wine production) मोठ्या प्रमाणात चालतो. दरम्यान हे मद्य देशी मद्य म्हणून वापरले जाते परंतु याचा वापर सर्वच स्तरात होत असतो यासाठी राज्य सरकारने मोहफुले आणि काजूच्या मद्यांना (mohful and cashews wine) विदेशी दर्जा देण्याचे ठरवले आहे. यामुळे काजू आणि मोहफुलांच्या मद्याला चांगला दर आणि मागणी मिळणार आहे. याचा फायदा उत्पादकांना बसणार आहे.
काजू बोंडे आणि मोहाफुलांपासून स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात येणाऱ्या देशी मद्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी या मद्याला आता विदेशी मद्याचा दर्जा मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विदेशी मद्य म्हटल्यास या मद्याच्या मूल्यवृद्धीस फायदा होईल, असा दावा सरकारद्वारे करण्यात आला आहे.
हे ही वाचा : गद्दार म्हटल्यामुळे तानाजी सावंत संतापले, 'औकातीत राहा' शिवसैनिकांनाच दिला इशारा
मोह आणि काजू बोंडापासून मद्यार्क निर्मितीद्वारे शेतकरी, महिला बचत गटांना रोजगाराचा आणि उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी देशी मद्यार्क निर्मितीला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक पातळीवर निर्मिती होणाऱ्या या
मद्यार्काला देशी मद्य संबोधले जाते. यामुळे या मद्याला मर्यादित ग्राहक आहेत. त्यामुळे विपणन आणि मूल्यवृद्धीस मर्यादा येत असल्याचे शासनाचे मत आहे. यामुळे या मद्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच मूल्यवर्धनासाठी विदेशी मद्याचा दर्जा शासनाकडून देण्यात आला आहे.
हे मद्यार्क करताना, फळे फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास, अशा परिस्थितीत दुसऱ्या फळे, फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण करण्यास मुभा राहील. मात्र या मद्यात इतर मळी व धान्याचा वापर करून विदेशी मद्य बनविता येणार नाही. तसेच फळे, फुलांपासून बनविलेल्या मद्यार्कामध्ये मळी, धान्यापासून बनविलेले मद्यार्क मिश्रण करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : 'XXला पाय लावून का पळाला, आता बकरी सारखे बेबे करू नका', संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
आदिवासी पाड्यांना फायदा
मोहाच्या फुलांपासून दारु गाळण्याला शासनाकडून मान्यता दिली गेली तर याचा फायदा आदिवासी बहूल पाड्यातील नागरिकांना मिळणार आहे. यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन त्यातून रोजगार निर्मिती आ अर्थसहाय्यहा मिळणार आहे. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुलांपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.
सध्या काजू उत्पादक तोट्यात
या वर्षी अनेकदा शेतकऱ्यांना वळीव पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुकं पडल्यामुळे त्याचा विपरित परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. हिवाळ्यामध्ये धुक्याचा परिणाम काजूच्या मोहरावर होऊन तो जळून जातो, तर आलेला मोहर जळूनही जातो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, महाराष्ट्र