Home /News /agriculture /

Cotton Seed Rate : कापसाच्या वाणांमध्ये मोठा काळाबाजार, 450 ग्रॅमच्या पाकिटाला शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेतल्याचे समोर 

Cotton Seed Rate : कापसाच्या वाणांमध्ये मोठा काळाबाजार, 450 ग्रॅमच्या पाकिटाला शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेतल्याचे समोर 

(Cotton Seed Rate) राज्यात कापसाच्या उत्पादन वाढीसाठी राज्य सरकार गावपातळीवर खानदेश, विदर्भ, मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम राबवत आहे.

  जळगाव, 05 जून : यंदा राज्यात कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. (Cotton Seed Rate) राज्यात कापसाच्या उत्पादन वाढीसाठी राज्य सरकार गावपातळीवर खानदेश, विदर्भ, मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम राबवत आहे. (Cotton production) परंतु खानदेशात सध्या कापसांच्या वाणांबाबत काळाबाजार सुरु असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कृषी विभागाकडून भरारी पथकांच्या तुकड्या कारवाईही करत आहेत, (Agriculture rate) परंतु काही कृषी सेवा केंद्रांमधून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सुरु आहे.

  खानदेशात कापसाच्या सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित वाणांची मागणी किमान दोन ते अडीच लाख पाकिटांची आहे. परंतु पुरवठा अत्यल्प आहे. यातच काही सरळ वाणांचा पुरवठा कंपन्यांकडून झालेलाच नाही. यामुळे या वाणांचा मोठा काळाबाजार सुरू आहे. या वाणाच्या एक ४३५ ते ४५० ग्रॅम वजनाच्या पाकिटाची विक्री तब्बल साडेतीन ते चार हजार रुपयांनी सुरू आहे.

  हे ही वाचा : Weather Update : विदर्भात उष्ण लाटेचा Yellow Alert, मान्सून गोव्यात मुक्कामाला IMD ची माहिती

  गुजरात, मध्य प्रदेशातून या वाणांची पुरवठा झाला आहे. दरम्यान या वाणांची खरेदी काही एजंट करीत आहेत. त्याची विक्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, धरणगाव, भडगाव, जामनेर, रावेर, एरंडोल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या भागांत अव्वाच्या सव्वा दरात सुरू आहे. हा काळाबाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यंदा 'एचटीबीटी' किंवा 'बोलगार्ड पाच' या वाणांच्या नावाखाली बियाण्यांची खानदेशात काळ्या बाजारात एप्रिलपासून विक्री सुरू होती. ही विक्री सुरू असतानाच सरळ वाणांचाही काळाबाजार सुरू झाला आहे.

  खानदेशात रावेर, शहादा, तळोदा भागांतील केळी उत्पादक बेवडसाठी सरळ वाणांची लागवड करतात. तर पारोळा अमळनेर, जामनेर, धरणगाव, शिरपूर व इतर असल्याची 'भागांतील टंचाईचा सामना करणारे शेतकरी कुजबूजदेखील सरळ वाण लागवडीला पसंती देतात. कमी पाणी आणि फवारणी, खतांच्या अल्प खर्चात सरळ वाणांद्वारे चांगले उत्पादन खानदेशात अनेक शेतकरी घेतात. त्यांची मागणी अडीच ते तीन लाख पाकिटांची आहे.

  हे ही वाचा : अपक्ष महाविकास आघाडीसोबतच? सतेज पाटलांचा दावा, मुंबईत सर्व आमदारांची मॅरेथॉन बैठक आयोजित 

  परंतु पुरवठा 5 ते 10 हजार पाकिटे एवढाच असतो. यातच अधिकची मागणी असलेल्या एका कंपनीच्या वाणाचा पुरवठा यंदा अद्याप झालेला नाही. या कंपनीकडून सरळ वाणांचा पुरवठाच होणार नाही, अशी अफवादेखील होती. यामुळे या कंपनीच्या वाणाचा काळाबाजार वेगात सुरू आहे. याचबरोबर विनापावती या वाणांची विक्री सुरू आहे. एजंट गावोगावी सक्रिय आहेत. काही कृषीकेंद्रचालकही यात खिसे भरत आहेत. प्रशासनाने याकडे काणाडोळा केला असल्याची कुजबुज देखील सुरू आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Jalgaon

  पुढील बातम्या