Home /News /agriculture /

Mushroom farming : मशरूमच्या शेतीत हे राज्य देशात पहिले, महाराष्ट्राचा अवघ्या पॉईंटने गेला नंबर

Mushroom farming : मशरूमच्या शेतीत हे राज्य देशात पहिले, महाराष्ट्राचा अवघ्या पॉईंटने गेला नंबर

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मशरूम शेतीचा चांगला फायदा होत आहे. (mushroom farm)

  पटना, 28 मे : मागच्या काही वर्षांपासून मशरूम शेतीत (Mushroom farming) प्रगती करणाऱ्या बिहारच्या (Bihar) शेतकऱ्यांनी (Bihar farmers) यंदा मात्र आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मशरूम उत्पादनाच्या बाबतीत देशात बिहार पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Bihar ranks first in the country in terms of mushroom production) राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बिहार मशरूम उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत संपूर्ण श्रेय राज्यातील शेतकऱ्यांना दिले आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याचे ते म्हणाले.

  राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची आकडेवारीनुसार

  2021-22 मध्ये बिहारमध्ये एकूण 28 हजार मेट्रिक टन मशरूमचे उत्पादन झाले, देशातील एकूण उत्पादित मशरूमच्या 10.82 टक्के आहे. गेल्या वर्षी बिहारमध्ये एकूण 23 हजार मेट्रिक टन मशरूमचे उत्पादन झाले होते. दरम्यान मागच्या 3 वर्षांपूर्वी बिहार मशरूम उत्पादनात 13 व्या स्थानावर होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यासाठी ही मोठी पर्वणी आहे, बिहार हे पारंपरिक पिकांच्या लागवडीसाठी ओळखले जाते. मात्र, राज्यात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात असून त्यात शेतकऱ्यांना यशही मिळत आहे.

  हे ही वाचा : BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची केंद्रात बदली, महाविकास आघाडीला झटका?

  प्रत्येक जिल्ह्यात 1000 मेट्रिक टन उत्पादन होणार

  फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीवरून बिहारनंतर महाराष्ट्र हा मशरूमच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ९.८९ टक्के आहे, तर तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या ओडिशाचा वाटा ९.६ टक्के आहे. बिहारमध्ये मशरूमच्या लागवडीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ.दयाराम यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 

  ते म्हणाले की, आम्ही सरकारी डेटा मशरूम संशोधन केंद्राकडे सुपूर्द केला आहे. कोरोनाच्या काळात बाहेरून बिहारमध्ये आलेल्या लोकांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि विक्रमी उत्पादन घेतले. ते म्हणाले की, ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या मशरूमची आकडेवारी आम्हाला मिळालेली नाही. राज्यात सर्व प्रकारचे लोक मशरूमची लागवड करतात. आमच्या अंदाजानुसार प्रत्येक जिल्ह्यात किमान 1000 मेट्रिक टन मशरूमचे उत्पादन होत आहे.

  हे ही वाचा : 'माझ्या वडिलांचा मी आदरच करतो, पण...', वडिलांच्या टीकेवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

  या यशाबद्दल डॉ.दयाराम नावाने प्रसिद्ध असलेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की आम्ही सरकारी डेटा मशरूम संशोधन केंद्राकडे सुपूर्द केला आहे. कोरोनाच्या काळात बाहेरून बिहारमध्ये आलेल्या लोकांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि विक्रमी उत्पादन घेतले. ते म्हणाले की, ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या मशरूमची आकडेवारी आम्हाला मिळालेली नाही. राज्यात सर्व प्रकारचे लोक मशरूमची लागवड करतात. ते म्हणाले की, आमच्या अंदाजानुसार प्रत्येक जिल्ह्यात किमान 1000 मेट्रिक टन उत्पादन होत आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Bihar, Farmer, Maharashtra News

  पुढील बातम्या