मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

नवरा बँकर, बायको CA; नोकरीला ठोकला रामराम, आता शेतीमुळे वर्षाला 1 कोटींची कमाई

नवरा बँकर, बायको CA; नोकरीला ठोकला रामराम, आता शेतीमुळे वर्षाला 1 कोटींची कमाई

ललित आणि खुशबू असे या दाम्पत्याचे नाव आहे.

ललित आणि खुशबू असे या दाम्पत्याचे नाव आहे.

ललित आणि खुशबू असे या दाम्पत्याचे नाव आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jodhpur, India
  • Published by:  News18 Desk

जोधपूर, 18 सप्टेंबर : आपली चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेणारे लोक फार दुर्मिळ असतात. मात्र, एका जोडप्याने असा निर्णय घेत यशस्वी होऊन दाखवले आहे. ललित आणि खुशबू असे या दाम्पत्याचे नाव आहे. जोधपूरचा रहिवासी असलेला ललित एमबीए केल्यानंतर बँकेत नोकरी करायचा, तर त्याची पत्नी चार्टर्ड अकाउंटंट होती. त्यानंतर अचानक दोघेही नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली आणि तो एक फायदेशीर व्यवसाय बनवून दाखवला. जाणून घ्या, या दाम्पत्याची यशस्वी कहाणी..

आज राजस्थानच्या सर्व शेतकऱ्यांना या दाम्पत्याने बनवलेल्या पॅटर्नचा अवलंब करायचा आहे आणि या माध्यमातून चांगला नफा मिळवायचा आहे. ललितने सुरुवातीला फक्त सेंद्रिय शेतीबद्दल ऐकले होते. या क्षेत्रात उतरायचे ठरवल्यावर त्यांनी सेंद्रिय शेतीवर संपूर्ण संशोधन केले. पुण्यात एमबीए करण्यासाठी गेल्यावर ग्रीन हाऊस आणि पॉलीहाऊसबद्दल ऐकले आणि पाहिल्याचे ते सांगतात. मग वाटलं माझीही अशी नर्सरी असायला हवी.

यानंतर त्यांनी आपल्या जमिनीवर हरितगृह आणि पॉलीहाऊस बांधून अप्रतिम रोपवाटिका सुरू केली. त्यानंतर सेंद्रिय फळे आणि भाज्यांची लागवड केली जाईल. पॉलीहाऊससाठी वडिलांकडून वडिलोपार्जित जमीन मागितल्याचे ललित सांगतात. सुरुवातीला त्यांची कल्पना ही त्यांच्या वडिलांना पटली नाही. नंतर हळूहळू त्यांनीही होकार दिला. त्यांनी सुरुवातीला फक्त एक लाख रुपये गुंतवले होते. आज त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 कोटींहून अधिक आहे.

ललितची पत्नी खुशबू या व्यवसायाने सीए आहेत. हे सर्व तिच्यासाठी नवीन होते. हळुहळू आता ती सगळा व्यवसाय सांभाळत आहे. आत्तापर्यंत आम्ही 60 हजार शेतकऱ्यांना शेतीचे गुण शिकवले आहेत. राजस्थानसारख्या कोरडवाहू राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन कल्पना देऊन त्यांना नफा मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्या सांगतात.

हेही वाचा - Life@25 : चाळीशी उलटली अन् मिळाला पहिला सिनेमा; मोगँबो बनून केलं लोखांच्या मनावर राज्य

ललित सांगतात की, राजस्थानमध्ये पाण्याची टंचाई कधी-कधी शेतकऱ्यांचे मन भंग पावते. अशा परिस्थितीत कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे मिळवायचे, कोणते पीक योग्य आहे, सेंद्रिय शेतीतून पैसे कसे कमवायचे, या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी आता आम्ही दोघे राजस्थानभर फिरतो. जर जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे सिद्ध करुन दाखवू शकतो, ललित आणि खुशबू यांच्या या उदाहरणावरुन ही शिकवण मिळते.

First published:

Tags: Organic farming, Rajasthan