मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! संत्र्यासह इतर फळं-भाज्याही थेट परदेशात जाणार; केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितला प्लॅन

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! संत्र्यासह इतर फळं-भाज्याही थेट परदेशात जाणार; केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितला प्लॅन

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - रॉयटर्स)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - रॉयटर्स)

महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातली संत्र तसंच अन्य फळं आणि भाजीपाला पिकांना योग्य बाजारपेठ मिळाली तर तिथल्या शेतकऱ्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं.

नागपूर, 19 जुलै : कृषी क्षेत्राला (Agriculture Sector) नैसर्गिक आपत्ती, मजूर टंचाई, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आदी संकटांचा वारंवार सामना करावा लागत आहे. त्यामुळे पीक उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. पीक उत्पादन, निर्यात आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. सध्याच्या शेती क्षेत्रासमोरच्या समस्या पाहता नवं तंत्रज्ञान, संशोधन आणि यांत्रिकीकरण या गोष्टी आवश्यक आहेत. महाराष्ट्रातल्या विदर्भ क्षेत्राचा (Vidarbha) विचार करता या भागातली संत्री, तसंच अन्य फळं आणि भाजीपाला पिकांना योग्य बाजारपेठ मिळाली, तर तिथल्या शेतकऱ्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. त्यासाठी तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि संशोधन आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी विदर्भातून फळं आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकते, असं सूतोवाच केलं आहे..

लिंबूवर्गीय फळं (Citrus fruits) आणि भाजीपाला (Vegetable) निर्यातीला (Export) प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने अमरावती येथे 'अपेडा'च्या (APEDA) वतीने फळं आणि भाजीपाल्यासह अन्य पीक-उत्पादनांच्या निर्यातीच्या संधी या विषयावर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "विदर्भात फळं आणि भाजीपाला निर्यातीला चालना देण्याची उत्तम क्षमता आहे. निर्यात वाढावी यासाठी शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा (Technology) अवलंब करणं गरजेचं आहे. तसंच नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे नवं संशोधन आणि पीक पद्धतीचा अवलंब विदर्भातल्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे"

हे वाचा - Soil Health Card: सरकारच्या मदतीनं गावात राहूनच करा हा व्यवसाय, होईल शेतकऱ्यांची गर्दी अन् लाखोंची कमाई

"2019-20 मध्ये भारतातून लिंबूवर्गीय फळांची निर्यात 329.32 कोटी रुपयांची झाली होती. त्याचप्रमाणे 2020-21 मध्ये ही निर्यात 590.4 कोटी रुपयांवर पोहोचली. ही निर्यात प्रामुख्याने नेपाळ, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि भूतानमध्ये झाली. यंदा ही निर्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. निर्यात बाजाराला (Export Market) समोर ठेवून शेतकऱ्यांनी जीआय टॅग असलेल्या नागपुरी संत्र्यासाठी लागवड साहित्याच्या योग्य निवडीवर भर द्यावा, तसंच सेंद्रिय पीक उत्पादनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करावं", असं आवाहन गडकरी यांनी केलं.

"अमरावती विभागात 70 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जीआय मानांकन असलेल्या नागपुरी संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं. या प्रदेशातून नागपुरी संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळं निर्यात करण्याची मोठी क्षमता आहे. नागपुरी संत्री (Nagpuri Orange) हे जीआय उत्पादन असल्याने ते प्रीमियम दरानेही विकता येऊ शकतं. कृषी शास्त्रज्ञांनी पीक उत्पादन वाढवण्यासाठी, वाण सुधारण्यासाठी आणि मूल्यवर्धनासाठी या क्षेत्रात संशोधन करावं", अशी सूचना गडकरी यांनी केली.

हे वाचा - PM Fasal Bima Yojana: पीक नष्ट झालं तरीही मिळेल सुरक्षा, शेतकऱ्यांना सरकार देतं एवढी रक्कम

गडकरी म्हणाले, "शेतकरी आणि निर्यातदारांनी शेतीमाल पॅकेजिंग करताना आयात करणाऱ्या देशांच्या नियमांचं काटेकोर पालन करावं. अन्नसुरक्षिततेच्या बाबींमध्ये गुणवत्तेच्या मानकांशी तडजोड न करता पीक उत्पादकता वाढवावी, जेणेकरून चांगलं उत्पादन हाती येईल. रसायनांच्या फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सध्याच्या पद्धतीच्या तुलनेत शेतीचं नुकसान 70 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. त्याचप्रमाणे चांगल्या दर्जाच्या पॅकेजिंग साहित्याचा वापर केल्याने हाताळणीच्या समस्या कमी होण्यास मदत होते"

"भारतीय मॅंडरीन संत्र्याची निर्यात गेल्या दोन वर्षांत दुप्पट झाली असली तरी आवश्यक संशोधन, विकास आणि मूल्यवर्धनातून ही निर्यात आगामी काळात अनेक पटींनी वाढू शकते,` असं गडकरी यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणं, दर्जा सुधारणं आणि परदेशात भारतीय शेतीमालाचा प्रचार करणं, यासाठी 'अपेडा'नं केलेल्या प्रयत्नांचं गडकरी यांनी कौतुक केलं. लागवडीखालच्या क्षेत्रवाढीसाठी कृषी आणि निर्यातीशी निगडित सर्वांसाठी 'अपेडा'ने क्षमतावृद्धी कार्यक्रम आयोजित करावा", अशी सूचना गडकरी यांनी केली असल्याचं वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे.

First published:

Tags: Agriculture, Farmer, Fruit, Nitin gadkari, Vegetable, Vidarbha