Home /News /agriculture /

ajit pawar : यंदाचा साखर हंगाम लांबल्याने पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला 'हा' निर्णय

ajit pawar : यंदाचा साखर हंगाम लांबल्याने पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला 'हा' निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार (minister ajit pawar) यांनी वक्तव्य केले आहे. पुढील वर्षापासून साखर कारखाने लवकर (sugar factory) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.

  पुणे, 24 मे : राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप (sugarcane farmer) राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड याभागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान राज्य सरकारने राहिलेल्या ऊस गाळपाबाबत (sugrcane) खबरदारी घेतली असली तरी संपूर्ण हंगाम संपण्यासाठी जूनचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (minister ajit pawar) यांनी वक्तव्य केले आहे. पुढील वर्षापासून साखर कारखाने लवकर (sugar factory)  सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. ते पुणे जिल्ह्यातील कोऱ्हाळे गावातील एका कार्यक्रमात बोलत होते.

  ते पुढे म्हणाले की, फक्त ऊस लागवड करण्याऐवजी पाण्याची उपलब्धता पाहूनच पिके घ्यावीत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती सहकारी साखर करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी सर्व गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत. यावर्षी मराठवाड्यात खूप प्रमाणात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. शासनाने १ मेपासून गाळप होणाऱ्या ऊसाला टना मागे २०० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले आहे. पुढील वर्षांपासून साखर कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

  हे ही वाचा : weather forecast : मुंबई, कोल्हापूर, कोकणासह विदर्भाला पुढचे चार दिवस जोरदार पावसाचा alert

  साताऱ्यातील शेतकऱ्यांने दिला ऊस पेटवून

  साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वतःचा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. राज्यकर्त्यांमुळे ऊस पेटवून देण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत दोन्ही साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसाला पालापाचोळा जास्त असल्याचे कारण देत ऊस तोडण्यासाठी नकार दिल्याने त्यांना शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचाही त्यांनी सत्कार केला.

  हे ही वाचा : government job recruitment : राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती, कोण करू शकतं Apply?

  गेली 20 महिने ऊसाचे पीक शेतात उभे आहे. अद्याप गाळप न झाल्याने ऊसाच्या वजनात मोठी घट झाली आहे. ऊस तोडीचे योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. दरम्यान बर्गे यांनी राज्य सरकारचा निषेध करत तीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवून दिला.

  राज्यात साखर उत्पादनात वाढ

  राज्यात मागच्या कित्येक वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरू असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. साखर कारखाने जवळ असुनही उसाला तोड येत नाही तर भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक शेतातच वाळत असल्याचे चित्र आहे. 

  दरम्यान राज्यात अद्यापही अद्याप 16 लाख टनापेक्षा जास्त ऊस शिल्लक आहे. हा ऊस कारखान्याला तुटून जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी  याबाबत माहिती दिली. राज्यात अजूनही बीड, उस्मानाबाद, यासह 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Ajit pawar, Farmer, Sugar facrtory, Sugarcane farmer

  पुढील बातम्या