कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी जोरदार होणार; 10 हजार दर मिळण्याची शक्यता

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी जोरदार होणार; 10 हजार दर मिळण्याची शक्यता

प्रचंड मागणी आणि वाढलेले दर यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत आनंदाची संधी मिळाली आहे. येत्या काही दिवसात कापसाचा भाव 10 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला (Latest cotton Rate) जात आहे.

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : अनियमित पावसाने कापसाचे (cotton) उत्पादन घटले असून सध्या बाजारात कापसाला मोठी मागणी आहे. व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करत आहेत. प्रचंड मागणी आणि वाढलेले दर यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत आनंदाची संधी मिळाली आहे. येत्या काही दिवसात कापसाचा भाव 10 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला (Latest cotton Rate) जात आहे.

कमी उत्पादन आणि वाढती मागणी या पार्श्वभूमीवर व्यापारी कापूस खरेदीसाठी सोशल मीडियाचाही वापर करत आहेत. असे पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले जात आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर खासगी कापूस व्यापारी 8300 ते 8500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाला दर देत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी

कापूस क्षेत्रातील निरीक्षकांचे म्हणणे आहे की, हा एक नवीन ट्रेंड आहे जेथे व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. हा चांगला प्रकार असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे त्यांचे मत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी असली तरी यंदा अपेक्षेप्रमाणे उत्पादन आले नाही. कापूस खरेदीसाठी खासगी कापूस व्यापारी आपापसात स्पर्धा करत आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. कमी उत्पन्नामुळे खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांना चांगला भाव देत आहेत.

हे वाचा - इंदुरीकर महाराजांच्या लस न घेण्याच्या वक्तव्यावर राजेश टोपेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

शेतकऱ्यांनी साठा बंद केला

महाराष्ट्रासारख्या राज्यात शेतकर्‍यांना प्रति क्विंटल 9000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कापसाचा एमएसपी 6250 रुपये प्रति क्विंटल आहे. किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे.

हे वाचा - पंतप्रधान मोदींची यंदाची दिवाळी काश्मीरमध्ये, राजौरीतील सैनिकांसोबत उजळणार दिवे

पावसामुळे पिकावर परिणाम झाला असून, त्याचाही उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता चांगली किंमत मिळाल्याने त्याची भरपाई होत आहे. दुसरीकडे, दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना आणखी दराची अपेक्षा आहे. काही शेतकरी आणखी दराच्या अपेक्षेने साठा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसांत ही किंमत 10,000 किंवा त्याहूनही वर जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कापसाचे ताजे दर -

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
03/11/2021 चंद्रपूर लोकल क्विंटल 2375 8000 8500 8300
03/11/2021 जळगाव मध्यम स्टेपल क्विंटल 56 5280 6290 5810
03/11/2021 नागपूर एच-४ - मध्यम स्टेपल क्विंटल 157 8485 8500 8497
03/11/2021 नांदेड --- क्विंटल 135 8500 8550 8520
03/11/2021 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 5650 8200 8600 8450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 8373
02/11/2021 बीड --- क्विंटल 103 9000 9101 9050
02/11/2021 बीड मध्यम स्टेपल क्विंटल 1232 8900 9000 9000
02/11/2021 चंद्रपूर लोकल क्विंटल 5147 8283 8567 8425
02/11/2021 नागपूर नं. १ क्विंटल 157 1500 2200 1800
02/11/2021 नागपूर लोकल क्विंटल 1404 8450 8600 8550
02/11/2021 नागपूर हायब्रीड क्विंटल 1379 8200 8650 8525
02/11/2021 नागपूर एच-४ - मध्यम स्टेपल क्विंटल 600 8500 8500 8500
02/11/2021 नांदेड --- क्विंटल 266 8310 8450 8400
02/11/2021 नांदेड मध्यम स्टेपल क्विंटल 73 8000 8200 8100
02/11/2021 परभणी एच - ६ - मध्यम स्टेपल क्विंटल 476 8680 8750 8700
02/11/2021 वर्धा एच-४ - मध्यम स्टेपल क्विंटल 2721 8300 8600 8450
02/11/2021 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 8300 8200 8550 8375
02/11/2021 यवतमाळ --- क्विंटल 10000 8200 8525 8450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 31858

दर स्त्रोत - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

Published by: News18 Desk
First published: November 3, 2021, 7:51 PM IST

ताज्या बातम्या