Home /News /agriculture /

GI tagging product : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सांगलीची हळद, आजरा घनसाळ तांदूळासह ही 12 कृषी उत्पादने मिळणार मुंबईत, तेही एकाच छताखाली

GI tagging product : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सांगलीची हळद, आजरा घनसाळ तांदूळासह ही 12 कृषी उत्पादने मिळणार मुंबईत, तेही एकाच छताखाली

भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात करण्यात आला. सध्या मॅाल संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्‍यांची कृषी उत्पादने टिकून ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 25 मे : महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात वेगळेपण जपले गेले आहे. विविध भौगोलिक रचनेनुसार तेथील कृषी क्षेत्रात बदल होत गेला आहे. (Agriculture sector) कोकणातील काजू, तर भंडाऱ्यातील तांदूळ असो किंवा सांगलीची हळद असो या ही कृषी उत्पादने (agriculture product) जगभरात प्रसिद्ध आहेत. दरम्यान राज्यातील 12 भौगोलिक मानांकन असलेली कृषी उत्पादने आता मुंबईत मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी याचा शुभारंभ केला आहे.

  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात राज्यातील 12 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक उत्पादने तयार करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी भौगोलिक मानांकन हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे यामुळेच राज्यातील 12 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादने विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.

  हे ही वाचा : बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? मी वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार : सदाभाऊ खोत

  भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्‍यांची गुणवत्तापूर्ण उत्पादने आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मॅाल संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्‍यांची कृषी उत्पादने टिकून ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.

  ग्राहक हा चोखंदळ असतो. त्याला चांगली उत्पादने हवी असतात. ग्राहकाला भौगोलिक मानांकन प्राप्त असलेली उत्पादने ही अधिक विश्वासार्ह वाटतात. गुणवत्ता व दर्जा टिकवून ग्राहकांचा विश्वास संपादन करता येते.

  हे ही वाचा :  Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

  भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे एखादी वस्तू व उत्पादनास विशिष्ट स्थानामुळे प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा आणि वेगळेपणा होय. वस्तू व उत्पादनांना वैज्ञानिक विश्लेषण, वैशिष्टपूर्ण गुणधर्म व पारंपरिक इतिहास सिद्ध केल्यावरच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त होते. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्याद्वारे भौगोलिक मानांकन देण्यात येते. जीआय टॅगमुळे फसवेगीरीस आळा बसतो व अस्सल दर्जाची उत्पादने असल्याची ग्राहकाला शाश्वती मिळते असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

  यात मंगळवेढा मालदांडी ज्वारी, नवापूर तूरडाळ, भिवापूर मिरची पावडर, पुणे आंबेमोहोर तांदूळ, महाबळेश्वर ड्राय स्ट्रॉबेरी, सांगली हळद, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, डहाणू चिक्कू पावडर, सांगली बेदाणा, वेंगुर्ला काजू, भंडारा चिन्नोर तांदूळ या उत्पादनांचा समावेश आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Ajit pawar, Farmer

  पुढील बातम्या