Home /News /agriculture /

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा; सरकारी पातळीवर हालचाली

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा; सरकारी पातळीवर हालचाली

सर्व कृषी उत्पादनांच्या निर्यातीस मदत करण्यासाठी सरकार वाहतूक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी प्रोत्साहन निधी देखील जाहीर करू शकतं. गेल्या वर्षीच सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालयाची घोषणा करण्यात आली होती.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न (Farmers Income) वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Union Budget 2022) मध्ये काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. बदलत्या बाजारपेठेनुसार शेतकऱ्यांना तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यादरम्यान, मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी अर्थसंकल्प 2022 (Agriculture Budget 2022) मध्ये गुंतवणुकीची घोषणा केली जाऊ शकते. यासोबतच, या कामासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणाही होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, सरकारी सूत्रांनी सांगितलं की, मूल्यवर्धन आणि बॅकवर्ड लिंकेजला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये देशातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी मदत करण्यासाठी बाजारपेठेची उभारणी करण्यासाठी मदतीचाही समावेश असेल. अन्न प्रक्रिया क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची शक्यता याशिवाय, इतर सर्व कृषी उत्पादनांच्या निर्यातीस मदत करण्यासाठी सरकार वाहतूक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी प्रोत्साहन देखील जाहीर करू शकतं. गेल्या वर्षीच सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालयाची घोषणा करण्यात आली होती. अर्थसंकल्पात त्याला बळकटी देण्याची घोषणाही शक्य आहे. हे वाचा - Hero इलेक्ट्रिक आणि महिंद्राचा मोठा करार; वर्षाला 10 लाख दुचाकी इलेक्ट्रिक गाड्यांची होणार निर्मिती सरकारनं आधीच अन्न प्रक्रियेसाठी 10 हजार 900 कोटी रुपयांचं प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) जाहीर केलं आहे. याव्यतिरिक्त, या भागात स्टोरेज आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र PLI योजना देखील जाहीर केली जाऊ शकते. कृषी आणि संबंधित क्षेत्रातील एकूण मूल्यवर्धित मूल्यापैकी ११.३८ टक्के वाटा एकट्या अन्न प्रक्रिया क्षेत्राचा आहे. नवीन घोषणांसह, त्यात आणखी वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. एका पिकावरील उत्पन्न अवलंबित ठेवणं कमी करावं लागेल ICRA च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी सांगितलं की, आपण तांदूळ निर्यातीवरील अवलंबून राहणं कमी केलं तर मूल्यवर्धन आणि कृषी उत्पादनांची निर्यात अधिक चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टीनं आपण खूप पुढं जाऊ शकतो. हे वाचा - Omicron: सावधान! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची दिसतायत ही 5 लक्षणे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी एकाच पिकावर उत्पन्नासाठी अवलंबून राहणं कमी करावं लागेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सहाय्य योजना देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता प्रत्येक कृषी उत्पादनासाठी प्रादेशिक न पाहता जागतिक मागणी आणि बाजारपेठ पाहून धोरणं आखली पाहिजेत, असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगही किरकोळ बाजाराशी जोडला गेला पाहिजे. यासाठी सरकारनं कोल्ड स्टोरेजसह लॉजिस्टिकमध्ये जलद गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Agriculture, Farmer

    पुढील बातम्या