Home /News /agriculture /

Pm Crop Insurance Scheme : राज्यातील 9 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मिळणार

Pm Crop Insurance Scheme : राज्यातील 9 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मिळणार

राज्यात मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. (Pm Crop Insurance Scheme)

  मुंबई, 27 मे : मागच्या वर्षी लाखो शेतकऱ्यांचे पीकाच्या (farmer) नुकसानीचे पैसे मिळाले नव्हते दरम्यान कित्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलने केली होती. पीक विमा कंपन्यांनी हात वर केल्याने झालेल्या नुकसानीचे करायचो काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता दरम्यान पंतप्रधान पीकविमा योजना 2021 मध्ये सहभागी झालेल्या साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटींचा फायदा होणार आहे. (Pm Crop Insurance Scheme)

  पंतप्रधान पीकविमा योजनेत खरीप 2021मध्ये सहभागी झालेल्या साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप चालू करण्यात आले आहे. मात्र तीन जिल्ह्यांमधील भरपाईला विमा कंपन्यांनी आक्षेप घेतल्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तूर्त भरपाई मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

  हे ही वाचा : महाराणा प्रताप यांच्या भाल्याचं वजन खरंच 81 किलो होतं का? वाचा काय आहे सत्य

  कृषी विभागाने खरिपातील पीककापणी प्रयोगाचे अंतिम निष्कर्ष विमा कंपन्यांना कळवताच कमी उत्पादन असलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे बंधन या कंपन्यांवर आहे. कापणी प्रयोग झाल्यानंतर भरपाईचा आकडा जर एक हजार रुपयांपेक्षा जास्त येत असल्यास संबंधित शेतकऱ्यांना जास्तीची रक्कम द्यावी. अथवा, या प्रयोगातून कमी उत्पादनानंतर भरपाईची रक्कम एक हजारांपेक्षा कमी येत असल्यास त्यात काही रक्कम टाकून एकूण किमान एक हजार रुपये संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे, अशा सूचना कंपन्यांना यापूर्वीच दिल्या गेल्या आहेत.

  दरम्यान काही जिल्ह्यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे; पण त्यामुळे सध्या आक्षेप नसलेली 422 कोटी रुपयांची भरपाई रक्कम राज्यभर वाटली जात असल्याचे माहिती मिळत आहे.

  हे ही वाचा : आधी कोविड..नंतर डिप्रेशन; वकील रात्री घराबाहेर पडले आणि परतलेच नाही, नागपूरातील धक्कादायक घटना

  कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्या नेतृत्वाखाली यंदा शेतकरी, शासन आणि विमा कंपन्या यांच्याशी उत्तम समन्वय ठेवला. त्यामुळे राज्यात यंदा विक्रमी म्हणजे तब्बल 51 लाख 64 हजार शेतकऱ्यांना विमा भरपाईचा लाभ मिळतो आहे. भरपाईपोटी मिळणारी ही रक्कम तीन हजार 54 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

  नुकसानीच्या प्रकारानुसार बहुतेक पात्र शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप झालेले आहे. पीककापणी प्रयोगाअंती आलेल्या भरपाई का रखडली निष्कर्षांच्या आधारे राज्यात किमान 800 कोटी रुपये वाटणे अपेक्षित आहे. हा आकडा अंतरिम आहे. मात्र काही जिल्ह्यांत विमा कंपन्यांनी आक्षेप नोंदवला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. परभणी जिल्ह्यात रिलायन्स कंपनीने केंद्राकडे तक्रार केल्याने भरपाई रखडली आहे. तर नाशिक, सोलापूर जिल्ह्यात आयसीसीआय लोंबार्ड कंपनीने भरपाईवर आक्षेप नोंदविला आहे. 

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer

  पुढील बातम्या