आणखी बातम्या ...

News18 Minis

A world of news at your fingertips
आणखी बातम्या

मुंबई, 08 ऑगस्ट:  परदेश प्रवासासाठी व्हिसा काढणं हे कठीण काम असतं. व्हिसाची फी, त्यासाठीची भरमसाठ कागदपत्रांची पूर्तता आणि इतकं करूनही व्हिसा मिळेल याबाबत खात्री नसणं या अतिशय त्रासदायक गोष्टी आहेत. युरोपातल्या शेंगेन प्रदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या एका युझरने ट्विटरवर या संदर्भातला एक खूप बोलका फोटो शेअर केला आहे. प्रकाश सप्तर्षी नावाच्या ट्विटर युझरने कागदपत्रांची चळत असलेला एक फोटो त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो ट्विटरवर खूप व्हायरल झाला आहे. या फोटोला आतापर्यंत 4K हून लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा फोटो रिट्वीट करून त्यावर आपलं मत मांडलं आहे.