मुंबई, 31 मे : मुंबईच्या माटुंगा लेबर कॅम्प मधील अवघ्या 21 महिन्याच्या समर्था सक्रोला हिची बुद्धिमत्ता चर्चेचा विषय बनलाय. समर्थानं नुकत्याच झालेल्या जनरल नॉलेजमधील एका स्पर्धेत अवघ्या पाच मिनिटात 70 प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. या पराक्रमामुळे समर्थाचं नाव इन्सुलिन सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, यंग मेमरी चॅम्पियन, युनिव्हर्सल रेकॉर्ड बुक, इम्प्रेसिव्ह रेकॉर्ड आणि बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मेमरी किड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय.