आणखी बातम्या ...
Datta Jayanti : ब्रिटीश अधिकाऱ्याच्या पुतळ्यापासून साकारली दत्ताची मूर्ती, पाहा Video

Datta Jayanti : ब्रिटीश अधिकाऱ्याच्या पुतळ्यापासून साकारली दत्ताची मूर्ती, पाहा Video

कोल्हापूर, 7 डिसेंबर :  कोल्हापूरचे फुलेवाडी हे एक प्रमुख उपनगर आहे. या उपनगराला अनेक जण येथील दत्त मंदिरामुळे ओळखतात. . फुलेवाडी परिसरात रंकाळा आडवा पाट कुरण इथे गवताचे कुरण होते. अनेकांची जनावरे गवत चरण्यासाठी इथे यायची आणि त्यासाठी कोल्हापूर दरबारला पट्टी भरली जात असे. येथीलच कामदार दत्तू राऊत यांच्या स्मरणार्थ श्रीपतराव बोंद्रे आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हे मंदिर उभारले गेले असल्याची माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त नागोजीराव पाटील यांनी दिली.येथील दत्तात्रयाचं मंदिर हे अनेकांचं श्रद्धास्थान असून याला अगदी स्वातंत्र्य लढ्याचाही इतिहास आहे

Wedding Season : लग्नात रुखवत का दिलं जातं माहिती आहे ? पाहा Video

Wedding Season : लग्नात रुखवत का दिलं जातं माहिती आहे ? पाहा Video

मुंबई, 7 डिसेंबर : लग्नसराईचे दिवस सुरु होताच शॉपिंगसाठी मुंबईच्या बाजारात गर्दी लोटली आहे. लग्नाचे दागिने, कपडे, भेटवस्तू या सर्व खरेदीसोबतच नवरीला सासरी पाठवताना रुखवत देण्याचीही प्रथा आहे. लग्नाच्या मंडपात एका बाजूला हे रुखवत मांडलेलं असतं. या वस्तूंमध्ये गृह सजावटीच्या वस्तू ,गृहोपयोगी वस्तू ,काही खाद्य पदार्थ सजवून ठेवलेले असतात. घर सजावटीच्या आणि वापरातील वस्तूंचा संग्रह म्हणजे रुखवत. रुखवत हे नवरीला माहेरच्या मंडळींकडून दिले जाते. लग्नानंतर हे रुखवत नवरी मुलगी सासरी घेऊन जाते.

सुपरहिट बॉक्स