S M L

ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट झाले 10 मिनिटांसाठी 'डिअॅक्टिव्हेट'

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट उपलब्ध नाही, असे सांगितले जात होते. मात्र यानंतर 10 मिनिटांनी अकाऊंट सुरू झाले.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 3, 2017 05:36 PM IST

ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट झाले 10 मिनिटांसाठी 'डिअॅक्टिव्हेट'

03 नोव्हेंबर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी काही वेळासाठी डिअॅक्टिव्हॅट करण्यात आले होते. काही तांत्रिक बिघाडामुळे हे डिअॅक्टिव्हेट करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट उपलब्ध नाही, असे सांगितले जात होते. मात्र यानंतर 10 मिनिटांनी अकाऊंट सुरू झाले.

तांत्रिक बिघाड काही वेळानंतर समस्या दूर करण्यात आल्या आणि आता त्यांचे ट्विटर अकाऊंट व्यवस्थित काम करते आहे. तेथील स्थानिक वेळेनुसार, ट्विटर कर्मचाऱ्यांच्या मानवी चुकांमुळे ट्रम्पचे यांचे अकाऊंट डिअॅक्टिव्हॅट झाले होते असा संदेश काही वेळानंतर ट्विटरकडून मिळाला. यामुळे जवळपास 11 मिनिटांपर्यंत ट्रम्प यांचे अकाऊंट बंद होते, मात्र पुन्हा त्यांचे अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. ही चूक कशी झाली, याची आम्ही चौकशी करत आहोत, असे ट्विटरकडून सांगण्यात आले.

तर दुसरीकडे हे ट्विटरच्याच एका कामगाराने डिलीट केल्यची हूल सोशल मीडियावर उठली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close