S M L

'सील' माशाने मुलीला समुद्रात ओढून नेलं आणि...

सील हा मासा कधीही माणसाचं नुकसान करत नाही. परंतु त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यावर मात्र ते आक्रमक होतात.

Sonali Deshpande | Updated On: May 22, 2017 10:11 PM IST

'सील' माशाने मुलीला समुद्रात ओढून नेलं आणि...

22 मे : सध्या सोशल मीडियावर कॅनडातील एक व्हिडिओ खूपच वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की काठावर बसलेल्या एका मुलीला सील  मासा समुद्रात  घेऊन जातोय. हे सर्व एवढ्या वेगात झालं की आजूबाजूच्या लोकांना काही समजलंच नाही. एका व्यक्तीने मुलीला वाचवण्यासाठी लगेचंच पाण्यात  उडी मारली.

सुदैवाने काही वेळात त्या व्यक्तीस समुद्रातील मुलीला वाचवण्यात यश आलं. असं म्हटलं जातं की, सील हा मासा कधीही माणसाचं नुकसान  करत नाही. परंतु त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यावर मात्र ते आक्रमक होतात.

मायकल फुजिवारा नावाच्या व्यक्तीने रेकॅार्ड केलेला हा व्हिडीओ ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय. ही घटना  ब्रि़टिश कोलंबियामधील रिचमंड इथे शनिवारी घडलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2017 10:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close