S M L

'जी-20' बैठकीसाठी मोदी होतायत जर्मनीला रवाना

उद्यापासून जर्मनीतल्या हॅमबॅर्गमध्ये जी 20 देशांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होते आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2017 01:01 PM IST

'जी-20' बैठकीसाठी मोदी होतायत जर्मनीला रवाना

06 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय ऐतिहासिक इस्रायल दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. इस्रायल आणि भारताच्या बड्या कंपन्यांच्या सीईओच्या संयुक्त परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर हैफा शहरात असणाऱ्या पहिल्या महायुद्धात मृत्यू पावलेल्यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून आपला दौरा संपवतील.

दुपारनंतर मोदी जर्मनीला रवाना होतील. उद्यापासून जर्मनीतल्या हॅमबॅर्गमध्ये जी 20 देशांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होते आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.

इस्रायलच्या अत्यंत भरगच्च दौऱ्यानंतर जी 20 देशांच्या बैठकीत आणि त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरही मोदींचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. जगातल्या सगळ्या आर्थिक, राजकीय सत्ताकेंद्रांचे प्रमुख या बैठकीत सामील होत आहेत. त्यामुळे बैठकीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close