S M L

'या' मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट पडलं महागात!

Samruddha Bhambure | Updated On: May 8, 2017 10:38 AM IST

'या' मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट पडलं महागात!

08 मे : फ्लोरिडामध्ये एका मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट चांगलंच महागात पडलं आहे. फ्लोरिडात फोटोशूट दरम्यान माॅडेल मॉली कावली हिच्यावर एका शार्कने हल्ला केला आहे. यात तिचा पाय जखमी झाला आहे.

समुद्रात उतरण्यापूर्वी  मॉली खूप खूश होती. परंतु काही वेळातच मॉलीचा उत्साह वेदनेत बदलला. मॉली फोटोशूटसाठी  पाण्यात उतरली असताना शार्कने अचानकपणे तिच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळे तिच्या पायातून रक्त येऊ लागलं आणि तिथल पाणी लालेलाल झालं होतं.

मॉलीला 10 फूट लांब लोमन शार्कने चावा घेतला असून हे शार्क प्रामुख्याने शांत आणि तुलनेने निरुपद्रवी असतात.

मॉली फोटोशूटसाठी तशी पूर्ण तयारीनिशी समुद्रात उतरली होती. मात्र, थोड्या वेळातच शार्कने तिला लक्ष्य केलं.

मॉलीच्या क्रूने तिला पाण्याबाहेर काढलं आणि लगेचंच रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले.  शार्कच्या या हल्ल्यात माॅली पूर्णपणे घाबरून गेली होती. तिच्या जखमेवर 20 टाके पडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2017 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close