S M L

रशिया : सेंट पीटर्सबर्गमध्ये मेट्रोत बाॅम्बस्फोट,10 ठार

या स्फोटात 10 जण ठार झालेत. तर अनेक जण जखमी झाले

Sachin Salve | Updated On: Apr 3, 2017 07:22 PM IST

रशिया : सेंट पीटर्सबर्गमध्ये मेट्रोत बाॅम्बस्फोट,10 ठार

03 मार्च  : रशियातील सेंट पिटर्सबर्ग शहरात मेट्रो ट्रेनमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 10 जण ठार झालेत. तर अनेक जण जखमी झाले.

सेंट पिटर्सबर्ग शहरातील मेट्रो स्टेशनवरील सबवे स्टेशनवर मेट्रोमध्ये स्फोट झालाय. या स्फोटानंतर  चेंगराचेंगरी झाल्याचंही वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 ठिकाणी हे स्फोट झाले.  घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सबवे स्टेशन बंद करण्यात आलंय.

या स्फोटामागे नेमकं कोण आहे याची चौकशी केली जाईल, असं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय. पुतिन हेसुद्धा सोमवारी सेंट पीट्सबर्गमध्ये होते पण स्फोटाच्या वेळी ते सेंट पीट्सबर्गचा दौरा आटोपून पुढे गेले होते. या स्फोटानंतर पूर्ण रशियामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मॉस्कोमध्येही सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close