S M L

मोदींनी चाखलं इस्रायलच्या समुद्राचं 'पाणी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्यात तिसऱ्या दिवशी डोर बीचला भेट दिली. तिथे त्यांनी मोबाईल पाणी शुद्धीकरणाचा फिरता प्लँट पाहिला

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2017 07:22 PM IST

मोदींनी चाखलं इस्रायलच्या समुद्राचं 'पाणी'

06 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्यात तिसऱ्या दिवशी डोर बीचला भेट दिली. तिथे त्यांनी मोबाईल पाणी शुद्धीकरणाचा फिरता प्लँट पाहिला. हे यंत्र काय करतं तर समुद्राचं पाणी घेऊन ते इतकं शुद्ध करतं की ते पिण्याजोगं होतं. मोदींनी ते पाणीही प्यायलं. सोबत पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू पण होते.

इस्रायलचे तज्ज्ञ मोदींना यामागचं तंत्रज्ञान समजावून सांगत होते. हा पाणी शुद्धीकरण प्लँट पाहण्याआधी मोदी समुद्राचा आनंद घेण्यासाठी गेले. सोबत नेतन्याहू होते. नेतन्याहू यांनी स्वत:हा मोदींचे सारथी झाले होते.

डोर बीचला भेट देण्याआधी हायफामध्ये पहिल्या महायुद्धातील शहीद भारतीय जवानाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. 1918 साली पहिल्या महायुद्धादरम्यान 44 भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हायफा शहराचं संरक्षण केलं होतं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फायफा इथं एक स्मारक तयार करण्यात आलंय. या स्मारकाचा संदर्भ मोदींनी त्यांच्या जेरूसलेम येथील भाषणातही घेतला होता. या पवित्र स्थळाला भेट देण्याची आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आज इस्त्रायल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी मोदी यांनी आपली ही इच्छा पूर्ण केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close