S M L

व्हॉट्सअॅपवर 'व्हिडिओ कॉलिंग' दरम्यान अॅप्स हाताळणं झालं सोपं

व्हाट्सअॅपने 'पिक्चर इन पिक्चर' हे नवीन फिचर आणलंय

Sonali Deshpande | Updated On: Jul 24, 2017 05:13 PM IST

व्हॉट्सअॅपवर 'व्हिडिओ कॉलिंग' दरम्यान अॅप्स हाताळणं झालं सोपं

24 जुलै:व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हाट्सअॅपने 'पिक्चर इन पिक्चर' हे नवीन फिचर आणलंय. या सुविधेमुळे युजर्सना आता व्हिडिओ कॉलिंग सुरू असतानाच मोबाईलमधील इतर अॅप्सवरही काम करता येणार आहे.

या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करणारे युजर्स आता छोट्या विंडोवरसुद्धा बोलू शकतात, म्हणजेच कॉलवर बोलता बोलता इतर अॅपवरही काम करु शकतात. सध्या हे नवं फिचर फक्त अॅँड्रॉइडसाठीच उपलब्ध असून लवकरच आय.ओ.एस.वर येण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये ही सुविधा नव्हती त्यामुळे मोबाईल धारकांना व्हिडिओ कॉलिंग सुरू असताना दुसरं काहीच करता येत नव्हतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close