S M L

कोहलीपेक्षा शिखर धवनची 'विराट' कमाई

बीसीसीआय ने नुकतीच 25 लाखाहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय.

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2017 09:44 PM IST

कोहलीपेक्षा शिखर धवनची 'विराट' कमाई

09 जून : कॅप्टन विराट कोहलीला स्पॉनसरशीप ही सगऴ्यात जास्त मिळतेय. टीममध्ये सर्वाधिक लोकप्रिय ही तोच. पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मॅचेसमधून सगळ्यात जास्त पैसे कमावणारा विराट नाही.

बीसीसीआय ने नुकतीच 25 लाखाहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय. या यादीनुसार फलंदाजांमध्ये शिखर धवनने सगळ्यात जास्त तब्बल 87.76 लाख रूपये कमवले. विराट कोहलीलने त्याच्या खालोखाल 83.07 लाख रूपये कमवले तर अजिंक्य रहाणे 81.06 लाख कमवत तिसरा आणि आर अश्विन आणि रोहित शर्मा यांनी 73.2 लाख रूपये कमवले.

सगळ्यात कमी पैसे वरूण एरॉन ने 32.15 लाख कमवले.

खेळाडूंना बीसीसीआयच्या नकद बक्षीसांचे आणि आयसीसीआय च्या टेस्ट रँकिंगचे ही करमुक्त भाग देण्यात आले. याशिवाय आशिष नेहराला त्याच्या दुखापतासाठी  कोटी 52 लाख रूपये  नुकसान भरपाई मिळाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close