S M L

रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक तर झहीर खान गोलंदाज प्रशिक्षकपदी

रवी शास्त्री यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा प्रशिक्षकपदाची माळ पडलीये. तर झहीर खानची गोलंदाज प्रशिक्षकपदी निवड झालीये. त्याचबरोबर द वाॅल राहुल द्रवीडवरही फलंदाजी सल्लागारपदी निवड करण्यात आलीये.

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2017 11:04 PM IST

रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक तर झहीर खान गोलंदाज प्रशिक्षकपदी

11 जुलै : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या नावाचा घोळ अखेर मिटलाय. रवी शास्त्री यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा प्रशिक्षकपदाची माळ पडलीये. तर झहीर खानही प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत असणार आहे. झहीर खानची गोलंदाज प्रशिक्षकपदी निवड झालीये. त्याचबरोबर द वाॅल राहुल द्रवीडवरही फलंदाजी सल्लागारपदी निवड करण्यात आलीये.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण होणार ?, अशी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून कॅप्टन विराट कोहलीची निवडच अंतिम ठरलीये. माजी प्रशिक्षक  रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा रवी शास्त्रींवर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्या झालेल्या वादानंतर अनिल कुंबळे प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले. त्यामुळे टीम इंडियाचा कोच कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तब्बल 10 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिर्चर्ड पायबस, लालचंद राजपूत, लान्स क्लुझनर, राकेश शर्मा आणि उपेंद्र ब्रम्हचारी या सगळ्यांनी अर्ज केले होते.

अखेर बीसीसीआयच्या निवड समितीने कॅप्टन विराट कोहलीशी चर्चा करून रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. पण घोषणा झाली खरी पण रवी शास्त्री यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस रात्री हा घोळ सुटला असून रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कमोर्तब झालंय. एवढंच नाहीतर झहीर खानवर गोलदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. विशेष म्हणजे द वाॅल राहुल द्रवीडवरही यांचीही फलंदाजी सल्लागारपदी निवड करण्यात आलीये. त्यामुळे टीम इंडियाला एक नाही तर तीन प्रशिक्षक मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 10:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close