S M L

पी.व्ही सिंधू उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पी.व्ही.सिंधूला उपजिल्हाधिकारीपदाचं ऑफर लेटरही दिलं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Jul 28, 2017 03:24 PM IST

पी.व्ही सिंधू उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त

28 जुलै : रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पी.व्ही .सिंधूहीची आंध्र प्रदेश सरकारने ग्रुप 1 अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गुरूवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पी.व्ही.सिंधूला उपजिल्हाधिकारीपदाचं ऑफर लेटरही दिलं आहे.

याआधीही ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्याबद्दल खूप बक्षीसांचा वर्षाव पी.व्ही.सिंधूवर झाला आहे. तिला उपजिल्हाधिकारी पदाचं ऑफर लेटर दिल्यावर नायडू यांनी ट्विट करून पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. तर सिंधूनेही ट्विट करून त्यांचे आभार मानले आहे.

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला 3 कोटी रूपये, अमरावतीत एक प्लॉट आणि उपजिल्हाधिकाऱ्याची नोकरी देण्याचं वचन दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close