S M L

आमचा पगार वाढवून द्या, विराट कोहलीची बीसीसीआयकडे मागणी

बीसीसीआयच्या आधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विराट कोहलीनं हा मुद्दा उपस्थित केला.

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2017 09:35 AM IST

आमचा पगार वाढवून द्या, विराट कोहलीची बीसीसीआयकडे मागणी

29 नोव्हेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने संघातील सहकाऱ्यांसाठी पगारवाढीची मागणी केलीय. तसंच बीसीसीआयच्या नफ्यात खेळाडूंचा वाटा विराटनं वाढवून मागितल्याचं समजतंय.

बीसीसीआयच्या आधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विराट कोहलीनं हा मुद्दा उपस्थित केला. नवी दिल्लीत शुक्रवारी बीसीसीआयसोबत भारतीय संघाची बैठक होणार आहे. या बैठकीत भारतीय खेळाडूंच्या वतीनं विराट कोहली, माजी कर्णधार धोनी आणि मुख्य कोच रवी शास्त्री परागवाढीसह इतर मागण्यावर बोर्डासमोर मांडणार आहेत.

सप्टेंबरमध्ये खेळाडूंसोबतचा करार संपुष्टात आला असून, नवीन करारामध्ये खेळाडूंना मिळणारे मानधन वाढवावे अशी मागणी खेळाडूंकडून करण्यात येतेय.

क्रिकेटच्या विविध फॉर्मटमधील कामगिरीच्या आधारे भारतीय संघातील खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात येते. या श्रेणीनुसार खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात येतो. अ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन, ब श्रेणीतील खेळाडूंना त्या खालोखाल तर क श्रेणीतील खेळाडुंना कमी मानधन देण्याची तरतूद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close