S M L

...तर आॅस्ट्रेलियासाठी खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये वाद सुरू आहे. जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 30 जूनपूर्वी नवी ऑफर स्वीकारली नाही तर आम्ही खेळाडूंना पैसे देणार नाही असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं म्हटलं होतं.

Sachin Salve | Updated On: Jun 7, 2017 10:07 PM IST

...तर आॅस्ट्रेलियासाठी खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला

07 जून : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा उपकर्णधार आणि सलामीचा धडाकेबाज खेळाडू डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डावर चांगलाच संतापला आहे. जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आम्हाला कोणता नवा कॉन्ट्रॅक्ट दिला नाही तर आम्ही ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार नाही असा इशारा वॉर्नरने दिला.

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये वाद सुरू आहे. जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 30 जूनपूर्वी नवी ऑफर स्वीकारली नाही तर आम्ही खेळाडूंना पैसे देणार नाही असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं म्हटलं होतं. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण टीम संपावर जाईल असा इशारा वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला होता. त्यामुळे  क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये सुरू झालेला हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 10:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close